Kunickaa Sadanand 10 Photos: बिग बॉस 19मध्ये 16 स्पर्धकांची एण्ट्री झालीय, यापैकी एक खेळाडू सीक्रेट रुममध्ये आहे. तर उर्वरित 15 स्पर्धकांमधील वादविवाद, जबरदस्त खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. यादरम्यान कुनिका सदानंद बिग बॉस 19च्या पहिल्या कॅप्टन झाल्याची माहिती समोर आलीय. कुनिका सदानंद या एकेकाळी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांनी सलमान खानसोबत (Salman Khan) 'हम साथ साथ है' आणि 'प्यार किया तो डरना क्या' या सिनेमांमध्ये काम केलंय.
कुनिकाने सिनेमांमध्ये खलनायिका आणि विनोदी भूमिका साकारल्या आहेत. त्या एक गायिका देखील आहेत आणि त्यांनी 1996मध्ये "लाखों में एक", 2002मध्ये "कुनिका" आणि 2006मध्ये "जूमबिश" नावाचाही अॅल्बम रिलीज केला होता.
प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता असरानी यांच्या पत्नी मंजू असरानी यांनी कुनिका यांना एका मालिकेमध्येही काम करण्याची संधी दिली होती.
धीरज कुमार दिग्दर्शित मालिका "अदालत"मध्येही त्यांना काम करण्याची संधी मिळाली होती.
कुनिका यांनी करिअरच्या सुरुवातीस 1988मध्ये भयपट सिनेमा "कब्रिस्तान"मध्ये काम केले होते. यावेळेस त्यांचे वय 28 वर्षे इतके होते.
बेटा, गुमराह आणि खिलाडी यासारख्या सिनेमामध्ये तिने खलनायिकेची भूमिका साकारली होती.
कुनिका यांनी 25 वर्षांमध्ये 110 सिनेमामध्ये काम केलंय. सिनेमाच्या प्रवासामध्ये त्यांनी किंग अंकल, कोहरा, आ गले लग जा, बाजी, लोफर, फरेब, हम साथ साथ हैं आणि फगली यासारख्या अन्य सिनेमांमध्ये दमदार अभिनय साकारलाय.
स्वाभिमानमध्ये त्यांनी 18 वर्षांच्या मुलाच्या आईची भूमिका साकारली होती.
दरम्यान कुनिका सदानंद यांचा बिग बॉस 19मधील खेळ प्रेक्षकांना आवडतोय. तर काही लोक त्यांना ट्रोल करतानाही दिसत आहेत.