कंडोम फॅक्ट्री अन् 150 बॉडीगार्ड..Bigg Boss 19 ची फेमस अभिनेत्री हात जोडून म्हणाली, "कोणतीही क्लिप.."

बिग बॉस फेम तान्या मित्तलने एका मुलाखतीत खळबळजनक खुलासे केले आहेत. तान्या मित्तलची पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Tanya Mittal latest Interview

Tanya Mittal Latest Interview :  बिग बॉस 19 मध्ये झळकलेल्या तान्या मित्तलने ‘150 बॉडीगार्ड' असण्याच्या अफवांवर अखेर स्पष्टीकरण दिलं आहे. या शोमध्ये अशाप्रकारचं कोणताही दावा केला नसल्याचं तिनं म्हटलं आहे. तान्याच्या संपत्ती आणि लाइफस्टाइलबद्दल बिग बॉसच्या घरात तुफान चर्चा रंगली होती. तिने याबाबत वेगवेगळी विधानेही केली होती. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर तान्याने आता सर्व खुलासे समोर आणले आहेत. तान्याने तिच्या खऱ्या आयुष्याबद्दल आणि जीवनशैलीविषयी माहिती दिली आहे. तान्याचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता, ज्यात तिची कंडोमची फॅक्ट्री दाखवण्यात आली होती. पण तान्याने आता नेमकं काय म्हटलं आहे? जाणून घ्या..

तान्या मित्तलने मुलखातीत नेमकं काय म्हटलं?

तान्याने एका शोमध्ये चर्चेदरम्यान म्हटलंय, "‘150 बॉडीगार्ड' असण्याचा दावा खोटा आहे. मी असं कधीच म्हटलं नाही. हा एक गैरसमज आहे. अशी कोणतीही क्लिप नाही ज्यात मी असं काही म्हटलेलं तुम्ही ऐकू शकता. माझ्याकडे 150 बॉडीगार्ड आहेत, याबाबत कोणतीही माहिती तुम्हाला मिळणार नाही. इंटरनेटवर तुम्हाला अशाप्रकारची एकही क्लिप मिळणार नाही".

नक्की वाचा >> Trending Video: 30 मीटर लांब सापावर चढली अन् भन्नाट नाचली, प्रसिद्ध गायिकेसाठी खर्च केले तब्बल 200 कोटी

तान्याने पुढे म्हटलं, “जीशान (जीशान कादरी) याबाबत खिल्ली उडवत होता. मी त्याला म्हटलं होतं की, करत होता. मी त्याला सांगितले होते की माझ्याकडे 150 पेक्षा जास्त स्टाफ मेंबर्स आहेत. पण ते बॉडीगार्ड असल्याचा गैरसमज त्याने केला. माझ्याकडे एक टेक्सटाईल फॅक्टरी, एक फार्मा फॅक्टरी आणि एक गिफ्ट फॅक्टरी आहे. मी तुम्हाला सगळं सांगू शकत नाही. मी कधीच खोटे बोलले नाही."

टीव्ही मालिकेतही झळकणार

या मुलाखतीदरम्यान तान्या म्हणाली की, "माझ्या करिअरमध्ये एक नवा टप्पा आला आहे. तिने म्हटले, मी आता अभिनेत्री झाले आहे. निर्माती एकता कपूरने तिला एका नवीन टेलिव्हिजन मालिकेची ऑफर दिली आहे. आता मी माझ्या डाएटबद्दल सावध आहे".

Advertisement

नक्की वाचा >> नवी मुंबईत किती उमेदवार रिंगणात? किती जणांनी अर्ज मागे घेतले? बेलापूर, वाशीसह संपूर्ण विभागाची A TO Z माहिती

दरम्यान, तान्या बिग बॉस 19 च्या फायनलिस्टपैकी एक होती. पण तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. या शोमध्ये गौरव खन्ना विजेता ठरला.तान्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत आणि आता ती टीव्ही मालिकेतही दिसणार आहे. बिग बॉसनं तिचं आयुष्य आणि करिअरसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.