जाहिरात

नवी मुंबईत किती उमेदवार रिंगणात? किती जणांनी अर्ज मागे घेतले? बेलापूर, वाशीसह संपूर्ण विभागाची A TO Z माहिती

नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आज 2 जानेवारीला पार पडली. त्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झालं आहे. किती उमेदवारांनी अर्ज घेतले मागे? वाचा सविस्तर माहिती.

नवी मुंबईत किती उमेदवार रिंगणात? किती जणांनी अर्ज मागे घेतले? बेलापूर, वाशीसह संपूर्ण विभागाची A TO Z माहिती
Navi Mumbai Election 2026 Latest News
मुंबई:

राहुल कांबळे, प्रतिनिधी

Navi Mumbai Municipal Election 2025 : नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आज 2 जानेवारीला पार पडली. त्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झालं आहे. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत एकूण 269 उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे एकूण 499 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अशातच सर्वच प्रभागांमध्ये निवडणुकीची चुरस वाढली असून प्रचाराच्या रणधुमाळीला वेग आला आहे.

प्रभागनिहाय स्थितीनुसार,बेलापूर विभागातून 46 उमेदवारांनी माघार घेतली असून 74 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. नेरूळ विभागात 55 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला आहे. तरीही 79 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. वाशी विभागात 25 उमेदवारांनी माघार घेतली असून 46 उमेदवार अंतिम यादीत आहेत. तुर्भे विभागात 33 उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे येथे 64 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.

कोपरखैरणे विभागात 62 उमेदवार निवडणूक लढवणार

कोपरखैरणे विभागात 29 उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे एकूण 62 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. घणसोली विभागात 30 उमेदवारांनी माघार घेतली असून 44 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. ऐरोली विभागात 29 उमेदवारांनी माघार घेतली असून 52 उमेदवारांनी या निवडणुकीत रणशिंग फुंकलं आहे. तर दिघा विभागात 22 उमेदवारांनी माघार घेतली असून 58 उमेदवार अंतिम यादीत आहेत.

नक्की वाचा >> Pune News: भीमाशंकर मंदिरात संतापजनक प्रकार, पुणे शिवसेना जिल्हाप्रमुखाचा खळबळजनक CCTV व्हिडीओ व्हायरल

महायुतीतील अंतर्गत राजकारण निर्णायक ठरलं

या माघार प्रक्रियेमागे महायुतीतील अंतर्गत राजकारण निर्णायक ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप व शिवसेना शिंदे गटामध्ये तिकीट वाटपात अनेक इच्छुक उमेदवारांना डावलण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने हस्तक्षेप करत अशा बंडखोर उमेदवारांना समज दिली आणि पक्षशिस्तीचा दाखला देत उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

नक्की वाचा >> Trending Video: 30 मीटर लांब सापावर चढली अन् भन्नाट नाचली, प्रसिद्ध गायिकेसाठी खर्च केले तब्बल 200 कोटी

माघारीनंतर अनेक ठिकाणी थेट लढती तर काही प्रभागांत तिरंगी आणि चौरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. चिन्हवाटप प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवार प्रत्यक्ष प्रचार मैदानात उतरले आहेत. हे उमेदवार सभा, पदयात्रा तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा जोरदार प्रयत्न सुरू झाला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकीत कोणत्या प्रभागात कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com