Bigg Boss 19: प्रणित मोरेचा 'डार्क' किस्सा! 'लहाणपणी रंगावरुन चिडवायचे', ती आठवण सांगताना झाला भावुक

Bigg Boss 19 Pranit More : नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये प्रणितचा एक खूपच भावनिक आणि संवेदनशील पैलू पाहायला मिळाला.

जाहिरात
Read Time: 2 mins
Bigg Boss 19 Pranit More : प्रणित मोरेनं मोठा खुलासा केला.
मुंबई:

Bigg Boss 19 Pranit More : बिग बॉस 19' (Bigg Boss 19) चा स्पर्धक प्रणित मोरे याने आपल्या जबरदस्त वन-लाइनर्स आणि कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवलंय. पण नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये प्रणितचा एक खूपच भावनिक आणि संवेदनशील पैलू पाहायला मिळाला. प्रणितने अशनूर कौर (Ashnoor Kaur) सोबत बोलताना बालपणीच्या अशा आठवणी सांगितल्या, ज्या ऐकून कोणाचेही डोळे पाणावतील. त्वचेच्या रंगावरून आणि इंग्रजी न बोलता आल्यामुळे त्याला कसं हिणवलं गेलं, याचा खुलासा प्रणितने केला आहे.

प्रणितनं सांगितली 'ती' आठवण

अशनूरसोबत बोलताना प्रणितने त्याच्या बालपणीच्या वेदना व्यक्त केल्या. प्रणित म्हणाला, "जेव्हा मी लहान होतो, तेव्हा मला नेहमी म्हटलं जायचं की, तू सावळ्या रंगाचा आहेस, म्हणून तू इतरांपेक्षा कमी आहेस. सगळे मला चिडवायचे. तेव्हा मला खूप वाईट वाटायचं की, अरे यार, ही गोष्ट तर माझ्या हातात नव्हती. मग त्या गोष्टीवरून मला का बोलत आहेत?

( नक्की वाचा : Dharmendra Net Worth: धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती किती? 100 एकर जागेत बनवलंय फार्म हाऊस, वाचा सर्व डिटेल्स )
 

"मी कोणालाही बॉडी शेम करत नाही..."

या कठीण अनुभवामुळेच प्रणित स्वतःच्या कॉमेडीमध्ये खूप काळजी घेतो. त्याने पुढे सांगितलं की, लहानपणीचे ते अनुभव किती खोलवर परिणाम करतात हे त्याला माहीत आहे, म्हणूनच तो स्टँड-अप कॉमेडी करताना किंवा या शोमध्येही कोणत्याही स्पर्धकाला जाड असण्यावरून किंवा त्वचेच्या रंगावरून कधीही हिणवत नाही. तो म्हणाला, "तुम्ही या शोमध्येही पाहिलं असेल, मी कोणालाही 'फॅट-शेम' करत नाही किंवा कोणाला दुखावणारे बोल बोलत नाही, कारण अशा कमेंट्सचा एखाद्या व्यक्तीवर किती खोल परिणाम होतो, हे मला माहीत आहे."

( नक्की वाचा : Bigg Boss 19 : टॉप-3 फायनलिस्टची नावे Viral; अमाल मलिक नाही, तर 'हा' TV स्टार ट्रॉफी उचलणार! )
 

इंग्रजी न बोलता आल्यामुळेही उडवली जायची खिल्ली

त्वचेच्या रंगाबरोबरच, प्रणितने त्याला इंग्रजी न बोलता आल्यामुळे शाळेत आणि कॉलेजमध्ये कसा त्रास सहन करावा लागला, हेदेखील सांगितलं. त्याने आठवण सांगितली, "शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना माझ्यात बोलण्याची हिंमत नव्हती आणि मला इंग्रजीही येत नव्हतं. त्यासोबत लोक तुम्हाला असं फील करून देतात की, जर तुम्हाला इंग्रजी बोलता येत नसेल, तर तुम्हाला काहीच माहीत नाही. आणि त्यानंतर लोक तुझ्या लूकवरही कमेंट करायचे." असं प्रणितनं सांगितलं.
 

Advertisement
Topics mentioned in this article