Bigg Boss 19 Contestant: सलमानच्या बिग बॉस 19 मध्ये 90 च्या दशकातील सुपरस्टार दिसणार? स्पर्धकांची नावं आली समोर?

'बिग बॉस'च्या ताज्या अहवालानुसार, सलमान खानच्या शोमध्ये अनेक लोकप्रिय स्पर्धकांची एंट्री होऊ शकते.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

प्रसिद्ध रिॲलिटी शो 'खतरों के खिलाडी 15' रद्द झाल्यामुळे, सलमान खानचा  शो 'बिग बॉस' यावेळी लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. 'बिग बॉस'च्या 19 व्या सीझनची प्रत्येकजण वाट पाहत आहे. यावेळी 'बिग बॉस' 5 महिने चालणार आहे.  यासाठी निर्मात्यांनी स्पर्धकांशी संपर्क साधायलाही सुरुवात केली आहे. 'बिग बॉस'च्या घरात सहभागी होण्यासाठी अनेक लोकप्रिय नावे आणि चेहऱ्यांची नावे समोर येत आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

'बिग बॉस'च्या ताज्या अहवालानुसार, सलमान खानच्या शोमध्ये अनेक लोकप्रिय स्पर्धकांची एंट्री होऊ शकते. यापूर्वी असे म्हटले जात होते की, या शोमध्ये यूट्यूबर आणि सोशल मीडिया स्टार्सना बोलावले जाणार नाही. परंतु ही केवळ अफवा ठरली आणि अनेक इन्फ्लुएंसरची नावेही 'बिग बॉस'च्या घरात सहभागी होण्यासाठी समोर येत आहेत. त्यातली काही नावे पुढील प्रमाणे. 

  • गौरव तनेजा
  • ममता कुलकर्णी
  • राज कुंद्रा
  • फैसल शेख
  • धीरज धूपर
  • कृष्णा श्रॉफ
  • अपूर्वा मखीजा
  • मुनमुन दत्ता
  • खुशी दुबे
  • राम कपूर
  • कनिका मान

या यादीव्यतिरिक्त 'बिग बॉस 19' साठी आणखी काही कलाकारांच्या नावांवरही चर्चा सुरू आहे. 'बिग बॉस'च्या ताज्या रिपोर्टनुसार, यांच्याशिवाय काही इतर कलाकारांशीही चर्चा सुरू आहे, सध्या निर्मात्यांनी स्पर्धकांबाबत कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Jalgaon News: पत्नीला कारखाली फरफटत नेत, अंगाची कातडी सोलली, हैवान पतीचा भयंकर 'कार'नाम!

'बिग बॉस 19' कधी प्रसारित होणार?
रिपोर्ट्सनुसार, सलमान खानचा शो 'बिग बॉस'चा नवीन सीझन जुलै 2025 पासून टीव्हीवर सुरू होईल. जानेवारी 2026पर्यंत चालेल. हा 'बिग बॉस'च्या इतिहासातील सर्वात लांब सीझन असणार आहे, सध्या शोशी संबंधित कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, परंतु सलमान नेहमीप्रमाणे 'बिग बॉस' होस्ट करताना दिसणार हे निश्चित झाले आहे.


Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world