सोशल मीडियावर Bigg Boss Boycott ट्रेंड; आर्याला घराबाहेर काढल्यामुळे चाहत्यांमध्ये संताप!

आर्याला बाहेर काढल्यामुळे चाहते संतापले..

जाहिरात
Read Time: 1 min
मुंबई:

बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi 5) पाचच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. स्पर्धक आर्या जाधव आणि निक्की तांबोळी (Arya Jadhav and Nikki Tamboli fighting) यांच्यातील वाद हाणामारीत बदलला. एका टास्कदरम्यान आर्या जाधवने निक्की तांबोळीच्या कानशिलात लगावली. कॅप्टन्सी टास्कदरम्यान हा प्रकार घडला. 

यानंतर निक्कीने खोलीबाहेर आल्यानंतर बिग बॉसकडे याबाबत तक्रार केली. या सर्व प्रकारानंतर आर्याला बिग बॉसच्या घरातून निष्कासित करण्यात आलं. घराबाहेर आल्यानंतर आर्याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

आर्याला बाहेर काढल्यानंतर चाहत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. आतापर्यंत बिग बॉसच्या घरात अनेक स्पर्धकांनी हिंसा केली आहे. निक्कीने आर्याच्या चेहऱ्यावर ओरबाडलं होतं. मात्र त्यावर काही कारवाई करण्यात आली नाही. सोशल मीडियावर मोठ्या संख्येने चाहते आर्याला पाठिंबा देत आहेत. चाहत्यांनी बिग बॉसच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. 

निक्की वारंवार आर्याला provoke करीत होती. त्यातून ही प्रतिक्रिया आल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. या निर्णयानंतर आपण बिग बॉस पाहणं बंद करीत असल्याचं सांगत #WesupportAarya ट्रेंड सुरू आहे.

Advertisement