रितेश देशमुखचा शो बिग बॉस मराठी सीजन 5 च्या (Bigg Boss Marathi Season 5) शोचा अंतिम सोहळा पार पडला. गुलिगत धोका देत सूरज चव्हाण या सीजनचा विजेता ठरला. तर गायक अभिजीत सावंत या सीजनचा ( Bigg Boss Marathi Season 5 Winner Suraj Chavan) उपविजेता ठरला. तर तिसऱ्या क्रमांकावर निक्की तांबोळीचं नाव आहे. निक्की यंदाच्या सीजनमधील सर्वाधिक फी घेणारी स्पर्धक आहे.
दहा आठवडे बिग बॉसच्या घरात राहणाऱ्या सूरजला जनतेने प्रचंड प्रेम दिलं आणि त्याच्या हाती विजयाची ट्रॉफी दिली. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि बिग बॉस मराठी पाचव्या सीजनचा विजेता सूरज चव्हाण याला ट्रॉफीसह 14.50 लाख रुपये मिळाले. सोबतच इलेक्ट्रिक स्कूटर आणि 10 लाखांचं ज्वेलरी वाऊचरही मिळाला. विशेष म्हणजे उपविजेता ठरलेल्या अभिजित सावंतनेही चांगले पैसे कमावले.
नक्की वाचा - Bigg Boss 5 : सूरज चव्हाण ठरला बिग बॉसच्या 5 व्या सीजनचा विजेता
सूरज चव्हाण याला बिग बॉस मराठी सीजन 5 मधून एकूण 24.6 लाख रुपये मिळाले. तर कोई मोई डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, त्याला दर आठवड्याला 25 हजार रुपये मिळाले होते. अंतिम आठवड्यापर्यंत त्याची एकूण किंमत 2.5 लाखांपर्यंत जाते. अभिजीत सावंत मात्र हरल्यानंतरही मालामाल झाल्याचं दिसतं. त्याची एकूण शोची कमाई सूरजपेक्षा 14 टक्क्यांनी जास्त आहे.
अभिजीत सावंतने किती कमावले?
अभिजीत सावंत बिग बॉस मराठी सीजन पाचचा उपविजेता ठरला. सूरज चव्हाण अंतिम सोहळ्यात विजेता ठरला. आपल्या गेम प्लानमधून अभिजीत सावंतने प्रेक्षकांना इम्प्रेस केलं. शेवटी त्याला एक लाख रुपयांचं गिफ्ट वाऊचर मिळालं. मात्र उपविजेत्यासाठी कोणताही कॅश प्राइज देण्यात आला नव्हता. मात्र अख्ख्या सीजनमध्ये त्याची चांगली कमाई झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रत्येक आठवड्यासाठी अभिजीत सावंतला 3-5 लाख रुपये मिळाले आहेत. अंतिम सोहळ्यापर्यंत त्याने 35 लाख कमावले. अभिजीत सावंतची नेटवर्थ 1.2 ते 8 कोटींपर्यंत असल्याचं सांगितलं जात आहे. या रिपोर्टनुसार अभिजीत एका सादरीकरणासाठी 6-8 लाख रुपये घेतो. दुसरीकडे निक्की तांबोळी तिसऱ्या क्रमांकावर असली तरी ती सर्वोधिक कमाई करणारी स्पर्धक आहे. तिला दर आठवड्याला 3.75 लाख मिळालेत. ज्याची एकूण रक्कम 37-50 लाखांपर्यंत जाते. त्यामुळे दहा आठवड्यात तिने इतर स्पर्धकांच्या तुलनेत सर्वाधिक कमाई केली आहे.