जाहिरात

Bigg Boss 5 : सूरज चव्हाण ठरला बिग बॉसच्या 5 व्या सीजनचा विजेता

सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजनचा विजेता ठरला आहे. अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण टॉप 2 मध्ये होते. मात्र सूरज चव्हाणला प्रेक्षकांनी दिलेल्या मतांमुळे त्यांने बाजी मारली आहे. 

Bigg Boss 5 : सूरज चव्हाण ठरला बिग बॉसच्या 5 व्या सीजनचा विजेता

गोलीगत खेळ दाखवत प्रत्येक आव्हानाला चीत करणारा सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला आहे. अभिजीत सावंत, निक्की तांबोळी यांसारखे सेलिब्रिटी स्पर्धक असताना देखील सूरज चव्हाणला भरभरून प्रेम मिळालं. सूरज चव्हाणने प्रेक्षकांनी दिलेल्या मतांमुळे बिग बॉस सीजन 5 मध्ये बाजी मारली आहे. 

सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, धनंजय पोवार हे सहा जण अंतिम फेरीत पोहोचले होते. प्रेक्षकांच्या मतांच्या आधारावर बिग बॉसचा विजेता ठरणार होता. प्रेक्षकांनी सूरज चव्हाणला भरभरून मते केल्याने सूरज चव्हाण विजयी ठरला आहे. 

अंतिम फेरीत जान्हवी किल्लेकर सहाव्या स्थानावर राहिली. मात्र जान्हवीने वॉकआऊट  केलं. 9 लाख रूपये घेऊन जान्हवी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. त्यानंतर अंकिता वालावलकर पाचव्या स्थानावर राहिली. धनंजय पोवार चौथ्या स्थानावर, निक्की तांबोळी तिसऱ्या स्थानावर तर अभिजीत सावंत दुसऱ्या स्थानावर राहिला. 

सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत सूरज चव्हाणचं अभिनंदन केलं. सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत म्हटलं की, "कलर्स मराठी या वाहिनीवर सुरु असलेल्या ‘बिग बॉस' या रियॅलिटी शोमध्ये आपल्या बारामतीचा रीलस्टार सूरज चव्हाण हा विजेता ठरला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येऊन सूरजने हे यश मिळविले. बिग बॉसच्या घरात सूरजने जनतेच्या हृदयात जागा निर्माण केली. त्याचे या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. सूरज आम्हाला तुझा अभिमान वाटतो."

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
Bigg Boss च्या घरात 20 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार? Instagram वर हा व्हिडीओ व्हायरल
Bigg Boss 5 : सूरज चव्हाण ठरला बिग बॉसच्या 5 व्या सीजनचा विजेता
bigg boss 18 salman khan hosting fees revealed likely to earn 250 crore
Next Article
सलमान खान 'बिग बॉस 18'साठी सिनेमाच्या कमाईपेक्षाही जास्त घेतोय मानधन, इतका आहे आकडा