Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan: बिग बॉस फेम सुरज चव्हाणचं लग्न ठरलं, कोकण हार्टेड गर्ल म्हणाली...

Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan: बिग बॉस मराठी 5 व्या सीझनचा विजेता सुरज चव्हाणचं खरंच लग्न ठरलं? असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. कारण कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकरने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे सुरजच्या लग्नाची चर्चा पुन्हा रंगू लागलीय.

जाहिरात
Read Time: 3 mins
"Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan: बिग बॉस मराठी 5 विजेता सुरज चव्हाणच्या घरात सनईचौघडे वाजणार"

Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan: 'बिग बॉस मराठी 5' सीझनचा विजेता सुरज चव्हाणच्या लग्नाची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागलीय. कारण कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू-वालावलकरने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अंकिताने नुकतेच सुरजच्या गावी जाऊन त्याची भेट घेतली. या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ तिनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. अंकिताच्या इन्स्टा स्टोरीमध्ये एका तरुणीसोबत फोटोही पाहायला मिळला. 'सुरजला खूप खूप शुभेच्छा!लग्नाला येणं शक्य होईल असं वाटत नसल्यामुळे ही भेट' असे कॅप्शन अंकिताने फोटोला दिलंय. पण फोटोतल्या तरुणीचा फोटो तिने इमोजीने झाकलाय. फोटो शेअर करुन सुरजचं लवकरच लग्न होणार असल्याची माहिती अंकिताने दिलीय. पण लग्नसोहळा कधी होणार आहे, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.  

Photo Credit: Ankita PrabhuWalawalkar Instagram

बिग बॉस मराठी विजेता सुरज चव्हाणचं लवकरच होणार लग्न | Suraj Chavan Marriage News

सुरज चव्हाणचा पुष्पा स्टाइल लुकमधील व्हिडीओ

19 सप्टेंबर रोजी सुरजने मिस्ट्री गर्लसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. सुरज आणि मिस्ट्री गर्लने साउथ इंडियन पेहराव परिधान केला होता. व्हिडीओमध्ये सुपरहिट सिनेमा पुष्पामधली डायलॉगही ऐकायला मिळतोय. पण सुरजने त्याच्या खऱ्या आयुष्यातील श्रीवल्लीचा चेहरा चाहत्यांना दाखवणे टाळलं. त्यामुळे सुरज चव्हाणची होणारी पत्नी कोण आहे, तिचे नाव काय आहे, ती काय करते, सुरज आणि तीच भेट कुठे व कशी झाली, त्याचे लग्न कसे ठरलं? अशा कित्येक प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यास चाहते आतुर झाले आहेत.  

सुरज चव्हाणची होणारी पत्नी कोण आहे?

बिग बॉसच्या घरामध्ये असताना सुरजने अनेकदा प्रेमभंग तसेच त्याला कशी मुलगी हवीय, याबाबत अनेकदा उल्लेख केला होता. अंकिताने दिलेल्या माहितीनंतर खरंच सुरजला त्याची जोडीदार भेटलीय का? हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. कारण बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सर्व सदस्यांच्या संपर्कात राहणार आहे, सर्वांना स्वतःच्या लग्नाला बोलवणार. लग्न साध्या पद्धतीनेच करणार. देवीमातेसमोर जोडीदाराच्या गळ्यात माळ घालणार, अशी लग्नाबाबतची स्वप्नं सुरजने सांगितली होती.     

विशेष म्हणजे एकटेपणा अनुभवल्यानंतर एका अनाथ मुलीसोबतच लग्न करणार असल्याचंही त्यानं म्हटलं होतं. दुसरीकडे अंकिताने प्रभू-वालावलकरने दिलेल्या माहितीनुसार सुरज चव्हाणचे लवकरच लग्न होणार आहे. पण विवाहसोहळा कधी आणि कुठे होणार आहे, हे जाणून घेण्यासाठी कदाचित त्याच्या चाहत्यांना प्रतीक्षा करावी लागेल.  

Advertisement

(नक्की वाचा: Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan: गुलीगत धोका फेम सुरज चव्हाणची ही श्रीवल्ली कोण आहे, मिस्ट्री गर्लसोबतचा व्हिडीओ पाहिला का?)

Advertisement

बिग बॉस मराठी रिअ‍ॅलिटी शोमुळे सुरज चव्हाण घराघरात पोहोचला. या कार्यक्रमामुळे त्याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली.