बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाण आता आपल्या आयुष्यातील नव्या टप्प्याला सुरुवात करत आहे. सूरज चव्हाण लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्याच्या लग्नाच्या आधीच्या विधींना उत्साहात सुरुवात झाली आहे. या विधींचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
प्री-वेडिंग शूटची चर्चा
सूरज चव्हाणच्या लग्नापूर्वी सर्वात जास्त चर्चा त्याच्या प्री-वेडिंग शूटची आहे. सूरज आणि त्याची होणारी पत्नी संजना यांचा प्री-वेडिंग शूटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे शूट एका स्टुडिओमध्ये करण्यात आले आहे. दोघेही वेस्टर्न आणि देसी अशा दोन वेगवेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळत आहेत.
सूरजची होणारी बायको संजना या शूटमध्ये *लाल रंगाच्या गाऊनमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तर, सूरज चव्हाण डेनिम शर्ट आणि पँटमध्ये स्टायलिश दिसत आहे. त्यांच्या या रोमँटिक आणि स्टायलिश लूकने चाहत्यांना भुरळ पाडली आहे. व्हिडिओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
सुरज आणि संजनाचा लग्न सोहळा कधी?
काही दिवसांपूर्वी सूरज आणि संजनाच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानुसार, दोघांचा साखरपुडा समारंभ 29 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता, हळदी समारंभ 29 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता आणि लग्नसमारंभ त्याच दिवशी संध्याकाळी 6.11 वाजता या शुभ मुहूर्तावर होणार आहे. पुण्यातील माऊली गार्डन हॉल येथे संजना आणि सुरजचं लग्न धुमधडाक्यात पार पडणार आहे.