Suraj Chavan Wife Pregnant: 'बिग बॉस मराठी' सीझन 5 चा विजेता आणि सोशल मीडिया कंटेंट क्रीएटर सुरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण यावेळी चर्चेचे कारण त्याचे कोणतेही नवीन गाणे किंवा सिनेमा नसून, त्याची पत्नी संजना चव्हाण हिची एक सोशल मीडिया पोस्ट आहे. संजनाने शेअर केलेल्या एका फोटोमुळे ती प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले आहे.
संजना चव्हाणच्या पोस्टमध्ये नेमके काय आहे?
संजनाने नुकतेच आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिचे बेबी बंप दिसत आहे आणि पोस्टमध्ये तिने देवकी सिनेमातील गाणे देखील जोडले आहे. त्यामुळे खरंच संजना प्रेग्नेंट आहे की हा तिचा एआय आधारित फोटो आहे? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडलाय. विशेष म्हणजे यापूर्वी 17 मार्च रोजी देखील संजनाने अशीच एक सूचक पोस्ट शेअर केली होती. त्यावेळीही चाहत्यांनी तिचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली होती. आता पुन्हा एकदा तशाच प्रकारची पोस्ट आल्याने चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
(नक्की वाचा: Gaurav More Marriage: फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे अडकला लग्नबंधनात; कोण आहे त्याची पत्नी? PHOTO VIRAL)