Bigg Boss Marathi Season 6: बिग बॉसच्या घरात येणार एंटरटेन्मेंटची त्सुनामी, राखी सावंतची वाइल्ड कार्ड एण्ट्री

Bigg Boss Marathi Season 6: बिगी बॉस मराठी सीझन 6मध्ये ड्रामा क्वीन राखी सावंतची एण्ट्री होणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Bigg Boss Marathi Season 6 Rakhi Sawant: राखी सावंतची वाइल्ड कार्ड एण्ट्री"
Colors Marathi

Bigg Boss Marathi Season 6: "ड्रामा, धक्का आणि धमाका!" या तीन शब्दांची एकच ओळख म्हणजेच... हो तीच... आता आली एंटरटेनमेंटची लहर. बिग बॉस मराठीच्या घरात पसरणार एंटरटेनमेंटचा कहर. बिग बॉस मराठी सीझन 6मध्ये पहिली वाइल्ड कार्ड स्पर्धक राखी सावंतची एण्ट्री होणार आहे. राखी सावंत घरात पूर्ण एंटरटेन्मेंटची त्सुनामी घेऊन येणार आहे. आतापर्यंत तयार झालेली समीकरणं, नाती, गटबाजी आणि समज-गैरसमज,  सर्व गोष्टींवर राखीचा एकच प्रश्नचिन्ह! तिच्या आगमनाने घरातल्या प्रत्येक सदस्याचा गेम हादरणार हे नक्की. कोणाशी मैत्री, कोणाशी वाद, कोणाच्या नाड्या आवळायच्या आणि कोणाला भावनिकरित्या गोंजारायचं हे सर्वकाही राखीच्या खेळात नेहमीच अनपेक्षित असतं. राखी सावंतच्या एण्ट्रीमुळे महाराष्ट्राला एन्टरटेन्मेंटचा भारी डोस मिळणार आहे.  

(नक्की वाचा: Divya Shinde Bigg Boss Marathi: TVवरच सदस्यांना जीवे ठार मारण्याची धमकी, बिग बॉसमधून दिव्या शिंदेची हकालपट्टी)

बिग बॉस मराठीमध्ये राखी सावंतची एण्ट्री

घरामध्ये एण्ट्री करण्यापूर्वी राखी सावंत म्हणाली की, "राखी जाणार आणि गेम पालटणार. माझ्याशिवाय बिग बॉस अधुरं आहे. मी घरात गेल्यावर सगळ्यांचा आवाज गायब होतो. जेव्हा राखी सावंत घरात जाणार तिची मर्जी चालणार आहे. मी घरात धम्माल करणार आहे. तुम्हाला माझे वेगवेगळे Costumes, माझा गेम पहायला मिळणार आहे. बिग बॉस प्लॅटफॉर्म सगळ्यांना नाही मिळत आपल्याला मिळाला आहे तर त्याचा उपयोग करून घ्या, हे माझं म्हणणं आहे. रितेश देशमुख अमेझिंग आहेत आणि उत्तम अभिनेते आहेत. संपूर्ण महाराष्ट्रमध्ये आपला बिग बॉस मराठी चालतो आहे, मला खूप अभिमान आहे, ते हा शो होस्ट करत आहेत. आपल्या मराठी लोकांसाठी आणि महाराष्ट्रासाठी मी बिग बॉस मराठी करत आहे."

राखी सावंतचा स्वभाव जितका बिनधास्त, तितकाच बेधडक तिचा खेळ. ती स्वतःच्या अटींवर खेळते आणि वेळ आली तर संपूर्ण घराची दिशा बदलते. बिग बॉस मराठीच्या घरात राखीची एण्ट्री म्हणजे ड्रामाचं लेव्हल अप! 

Advertisement