Jahnavi Killekar: "मला दृष्ट कुणी लावली?", जान्हवीचा Insta वर चाहत्यांना सवाल, कमेंटमध्येच मिळालं उत्तर

जान्हवीने काही दिवसांपूर्वीच रुग्णालयातून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने "नजर इज रिअल" असे कॅप्शन याला दिले आहे. यावर तिला भरभरून कमेंट्स आल्या होत्या. त्यानंतर तिने नवीन व्हिडीओ शेअर केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Jahnavi Killekar VIDEO: 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीजनची स्पर्धक जान्हवी किल्लेकरला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. बिग बॉस विजेता सूरज चव्हाणच्या लग्नात हजेली लावून आल्यानंतर जान्हवीची तब्येत अचानक बिघडली होती. धावपळ, प्रवास, अपुरी झोप यामुळे तिची तब्येत बिघडली होती. रुग्णालयातून आल्यातनंतर तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत "मला कुणाची नजर लागली?" असा सवाल चाहत्यांना केला आहे. जान्वहीला कमेंट्समध्येच चाहत्यांनी उत्तर देऊन टाकलं आहे.

काही दिवसांपूर्वीच तब्येत बिघडल्याने जान्हवीला मुंबईतील 'कोकिलाबेन धीरूभाई अंबानी' या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जान्हवीने रुग्णालयातून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने "नजर इज रिअल" असे कॅप्शन याला दिले आहे. यावर तिला भरभरून कमेंट्स आल्या होत्या. त्यानंतर तिने नवीन व्हिडीओ शेअर केला आहे.

जान्हवीने नवीन व्हिडीओमध्ये म्हटलं की, नुकताच मी एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात मी 'नजर इज रिअर' असं म्हटलं होतं. सगळ्यांचंही तेच म्हणणं होतं की तुला दृष्ट लागली. पण सगळ्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. मग दृष्ट कुणी लावली? असा सवाल जान्हवीने केला.

Advertisement

(नक्की वाचा-  Chhatrapati Sambhajinagar: लग्न करुन घरी निघाले, रस्त्यात चौघांनी कार अडवली अन् डोळ्यासमोर नवरी गायब!)

चाहत्यांच्या कमेट्स

मात्र जान्हवीच्या या पोस्टवर काहींना कॉमेडी तर काही कमेंट्स करत तिला सुनावलं आहे. एका युजरने म्हटलं की, "अगं ताई तुला दुष्ट नाही लागली तू खूप धावपळ केल्यामुळे तुला ते अशक्तपणा जाणवला असेल दुष्ट वगैरे काही नसतं." आणखी एका युजरने म्हटलं की, "CID चौकशी करावे लागेल ACP प्रद्युमन सांगावे लागेल काही तरी गडबड आहे दया." एका युजरने तर जान्हवीवर टीका करत म्हटल की, "अहो मॅडम तुमच्यापेक्षा खूप मोठे मोठे सेलिब्रेटीज आहेत ते कधी एवढी स्टेटस ठेवत नाहीत."

Advertisement