अभिनेता बॉबी देओल याचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे. बॉलिवूडमध्ये त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचे चित्रपट असो की वेब सिरीज त्याची आणि त्याचा अभिनयाची चर्चा ही नेहमीच होत असते. आता बॉबीची चर्चा होत आहे पण त्यामागचे कारण मात्र थोडं वेगळं आहे. त्याची चर्चा त्याच्या लेकामुळे होत आहे. त्याला कारण ही तसचं आहे. त्याच्या मुलाने चक्का 12 वीनंतर शिक्षणाला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामागचे कारण ही आता समोर आले आहे. त्याचीच चर्चा सर्वत्र होत आहे.
अभिनेता बॉबी देओल सध्या आपल्या करिअरच्या दुसऱ्या टप्प्यात जबरदस्त यश मिळवत आहेत. 'ॲनिमल' चित्रपटानंतर 'आश्रम' वेब सीरिजमुळे तो विशेष चर्चेत आहे. त्यांच्या यशासोबतच आता त्यांच्या मुलांचीही चर्चा सुरू झाली आहे. देओल कुटुंबाचे आणि बॉलिवूडचे नाते तीन पिढ्यांचे आहे. धर्मेंद्र यांच्यानंतर सनी आणि बॉबी देओल यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सनी देओल यांचा मुलगा करण देओल यानेही चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. त्यामुळे आता बॉबी देओल यांचे दोन्ही मुलगेही लवकरच बॉलिवूडमध्ये दिसणार का, याबद्दल उत्सुकता आहे.
बॉबी देओल यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या मुलांबद्दल माहिती दिली. मुलांना चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी शिक्षण पूर्ण करावे, अशी त्यांची इच्छा होती. पण ते होऊ शकले नाही. बॉबी देओल यांनी सांगितले की, त्यांचा छोटा मुलगा धरम देओल याने बारावी पूर्ण होताच पुढील शिक्षण सोडले आहे. दोघांनाही चित्रपटांमध्ये काम करण्याची आवड आहे, पण पूर्ण तयारीनंतरच त्यांनी या क्षेत्रात उतरावे, असे बॉबी देओल याला वाटते.
छोट्या मुलाने शिक्षण सोडले असले तरी, बॉबी देओल यांचा मोठा मुलगा आर्यमन देओल याने मात्र न्यूयॉर्क स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्रवेश घेतला आहे. बॉबी देओल यांने सांगितले की, या युनिव्हर्सिटीबद्दल त्याला फारशी माहिती नाही, पण ज्यांच्याशी चर्चा केली, त्यांनी आर्यमनचे कौतुकच केले. आर्यमन सध्या चित्रपटांमध्ये उत्तम कामगिरी करण्यासाठी स्वतःवर बारीक लक्ष ठेवून काम करत आहे. त्यामुळे बॉबी देओलची दोन्ही मुलं पुढच्या काळात बॉलिवूडमध्ये दिसतील यात शंका नाही.