जाहिरात

'मी रात्री तुमच्यासोबत झोपू का…', आपल्यापेक्षा वयाने मोठ्या अभिनेत्रीकडे अभिषेक बच्चनने व्यक्त केली होती इच्छा

आता अभिषेक एका नव्या कारणाने चर्चेत आला आहे. त्याने एकदा स्वतःच्या बालपणीच्या ‘क्रश’बद्दल एक मजेशीर किस्सा सांगितला आहे.

'मी रात्री तुमच्यासोबत झोपू का…', आपल्यापेक्षा वयाने मोठ्या अभिनेत्रीकडे अभिषेक बच्चनने व्यक्त केली होती इच्छा
मुंबई:

Abhishek Bachchan: बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हा केवळ सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा मुलगा म्हणूनच नाही, तर त्याच्या शांत आणि सभ्य स्वभावामुळे इंडस्ट्रीत त्याची वेगळी ओळख आहे. त्याची नावं अनेकां सोबत जोडली गेली. प्रेम प्रकरणाची चर्चा ही झाली. अफवाही उडाल्या. पण त्यावर अभिषेकने कधीच भाष्य केले नाही. उलट अनेक चर्चा आणि प्रेमप्रकरणांच्या अफवांवर ऐश्वर्या रायशी विवाह करून त्याने सर्वांनाच चोख प्रत्युत्तर दिलं होतं. शिवाय या सर्व चर्चांनाही त्याने पूर्णविराम लावला होता. आता अभिषेक एका नव्या कारणाने चर्चेत आला आहे. त्याने एकदा स्वतःच्या बालपणीच्या ‘क्रश'बद्दल एक मजेशीर किस्सा सांगितला  आहे. हा किस्सा ‘यारों की बरात' या टीव्ही शोमध्ये त्याने सांगितला. 

हा किस्सा 1983 मध्ये ‘महान' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा आहे. हे शूटिंग नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये सुरू होते. त्यावेळी लहान असलेला अभिषेक सेटवर कलाकारांसोबत वेळ घालवायचा. एका रात्री सर्वजण जेवण करून आपापल्या हॉटेल रूममध्ये झोपण्यासाठी निघाले होते. त्याच वेळी अभिनेत्री जीनत अमान (Zeenat Aman) जात असताना अभिषेकने त्यांना थांबवले. जीनत अमान या अभिषेक बच्चनच्या लहान पणीच्या क्रश होत्या. त्या त्याला खूप अवडत होत्या. तो त्यांचा चाहता होता. 

नक्की वाचा - Ladki Bahin Yojana: E- KYC, OTP ची चिंता मिटणार, पण 'या' लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढणार

अभिषेक बच्चनने सांगितले की, जीनत अमान या त्याचे पहिले प्रेम (First Love) होत्या. त्या जेव्हा झोपण्यासाठी जात होत्या, तेव्हा अभिषेकने त्यांना विचारले, “जीनत आंटी, तुम्ही कुठे चालला आहात? त्यावर त्यांनी उत्तर दिले की, “रूमवर झोपायला जात आहे. लहान मुलांना एकटं झोपण्याची सवय नसते, या निरागसतेतून अभिषेकने त्यांना थेट विचारले, “मी तुमच्यासोबत झोपू का…? अभिषेकने त्यावेळी केलेल्या या प्रश्नाला जीनत यांनी ही त्याच निरागसतेने उत्तर दिलं होतं. हे उत्तर काय होतं हे ही अभिषेक भच्चन यांनी या शो मध्ये सांगितलं आहे. 

नक्की वाचा - Pune News: फक्त 90 मिनिटांत मुंबई-पुणे प्रवास! पुण्यात जाण्यासाठी तिसरा ‘सुपरफास्ट' महामार्ग लवकरच

अभिषेकच्या या प्रश्नावर जीनत अमान यांनीही खूप सहज आणि हसतमुख उत्तर दिले. त्यांनी अभिषेकला म्हटले की, “आधी थोडं मोठं हो, मग झोप…” हा किस्सा ऐकून शोमध्ये उपस्थित असलेले संजय दत्त (Sanjay Dutt), अजय देवगन (Ajay Devgn) आणि इतर कलाकारांना हसू आवरले नाही. बच्चन कुटुंबीयांच्या मुलाचा हा किस्सा आजही अनेक बॉलिवूड चाहत्यांच्या स्मरणात आहे. या किस्सा ऐकल्यानंतर संजय दत्त आणि अजय देवगण हे लोटपोट झाले. त्यांना हसू आवरले नाही. सध्या या किस्स्याची चर्चा जोरदार सुरू आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com