Akshaye Khanna Dhurandhar Fees: बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता अक्षय खन्ना आपल्या दमदार अभिनयाने लोकांचे हृदय जिंकण्याची एकही संधी सोडत नाही. अक्षय खन्ना इंडस्ट्रीमध्ये 20 वर्षांहून अधिक काळापासून काम करतोय. वर्ष 1997 मध्ये त्याने हिमालय पुत्र सिनेमाद्वारे पदार्पण केलं होतं. सध्या अक्षय धुरंधर सिनेमातील त्याच्या 'रहमान डकैत' या भूमिकेमुळे चर्चेत आहे. अक्षयनं भूमिकेला पूर्ण न्याय दिलाय आणि प्रेक्षकांचं इतकं मनोरंजन केलंय की बाकी सर्व फिकं दिसतंय. सिनेमामध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहे, पण सिनेमामध्ये अक्षय खन्नाचे स्वतःची भूमिका उत्तमरित्या साकारलीय. 'रहमान डकैत'ची भूमिका साकारण्यासाठी अक्षय खन्नाला किती मानधन मिळालंय हे तुम्हाला माहितीये का?
(नक्की वाचा: कोण होता रहमान डकैत? Dhurandhar मध्ये Akshaye Khanna ने साकारलीय भूमिका, स्वत:च्या आईचीच केली होती हत्या)
धुरंधर सिनेमासाठी अक्षय खन्नाने किती मानधन घेतलं?
कोईमोईच्या रिपोर्ट्सनुसार, धुरंधर सिनेमा 250 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलाय. सिनेमासाठी रणवीर सिंहने कथित स्वरुपात 30-50 कोटी रुपये मानधन घेतलंय तर अक्षय खन्नाला 2.5 कोटी रुपये इतकंच मानधन देण्यात आल्याची माहिती आहे, दरम्यान याबाबत अधिकृतरित्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण ज्या पद्धतीने अक्षयने आपली भूमिका साकारलीय, त्याला मोठ्या पडद्यावर पाहताना लोक थक्क झाले आहेत.
(नक्की वाचा: Dhurandhar Movie: अक्षय खन्नाच्या Ex गर्लफ्रेंडची ती पोस्ट चर्चेत, धुरंधर अभिनेत्याने नात्याबाबत काय सांगितलं होतं?)
अक्षय खन्नासमोर सर्व दिसतायेत फिके
अक्षय खन्ना आता रोमँटिक भूमिकांमधून बाहेर आलाय. छावा सिनेमानंतर त्याने आता धुरंधर सिनेमामध्येही दमदार खलनायकाची भूमिका साकारलीय. अक्षय खन्नाची ही खलनायकाची भूमिका सर्वांनाच प्रचंड आवडलीय. सोशल मीडियावर सर्वत्र अक्षय खन्नाचे रील्स दिसत आहेत. लोक त्याच्या कमबॅकची तुलना बॉबी देओलशी करत आहेत, अॅनिमल सिनेमातील बॉबीच्या भूमिकेसही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.