Deepak Padukone: बॉलिवूडची 'शांती प्रिया' म्हणजेच अभिनेत्री दीपिका पादुकोणने सध्या स्वतःला कामापासून दूर ठेवले आहे. कारण सध्या ती प्रेग्नेंसी पीरियड एन्जॉय करत आहे. दीपिकाचे एअरपोर्ट किंवा शूटिंग सेटवरील फोटो-व्हिडीओ व्हायरल होतात, तेव्हा चाहत्यांची नजर तिच्या बेबी बंपवर खिळलेली असते. यादरम्यान 20 मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याकरिता ती पती रणवीर सिंहसोबत मतदान केंद्रावर पोहोचली गेली होती. दोघांचाही हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कार थांबताच रणवीर लगेच कारमधून बाहेर आला. यानंतर सुरक्षा रक्षकाने कारचा दरवाजा उघडल्यानंतर दीपिकाला बाहेर येण्यासाठी रणवीरने तिला हात देऊन मदत केली. पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि डेनिम जीन्समध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत होती. या लुकमध्ये तिचे बेबी बम्प देखील दिसले. दरम्यान या अवस्थेत चालताना तिला त्रास होत असल्याचे वाटत होते. त्यामुळे रणवीरचा हात पकडून ती चालत होती.
(नक्की वाचा: राजकारण व्यवसाय नव्हे तर खूप मोठे कर्तव्य: रेणुका शहाणे)
चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा
दीपिका पादुकोणचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. चाहत्यांनी दीपिकाला आरोग्याची काळजी घेण्याचेही सल्ले दिले आहेत. एका चाहत्याने लिहिलेय की, "अरे वाह बेबी बम्प दिसत आहे. तुझे बाळ निरोगी असावे, अशी मी प्रार्थना करतो". आणखी एकाने लिहिलेय,"दोघांचंही एकमेकांवरील प्रेम पाहून छान वाटत आहे".
(नक्की वाचा: तेलुगू सिनेसृष्टीवर शोककळा, अभिनेत्रीनेच्या निधनानंतर अभिनेत्यानं उचललं टोकाचे पाऊल)
दरम्यान रणवीर आणि दीपिका पादुकोणची जोडी 'सिंघम अगेन' सिनेमाद्वारे प्रेक्षकांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या व्यतिरिक्त रणवीर सिंह 'डॉन 3' सिनेमामुळेही चर्चेत आहे. 'शक्तिमान' सिनेमातही तो झळकणार असल्याची चर्चा आहे, पण अद्याप याबाबत कोणती अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
(नक्की वाचा: Lok Sabha Election 2024: अक्षय कुमारपासून ते जान्हवी कपूरपर्यंत, या बॉलिवूडकरांनीही केले मतदान)