VIDEO: दीपिका पादुकोणला मिळाला डिस्चार्ज, लक्ष्मीला घरी घेऊन जाताना पाहा दीपवीरची पहिली झलक  

Deepika Padukone Discharged From Hospital: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणला डिस्चार्ज मिळाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Deepika Padukone Discharged From Hospital: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने 8 सप्टेंबरला गोंडस मुलीला जन्म दिला. यानंतर पहिल्यांदाच आईबाबा झालेल्या दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहची झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. यादरम्यान हॉस्पिटलमधून घरी जात असताना त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत त्यांच्या लेकीला कारमधून घरी घेऊन जात असल्याचे दिसत आहे. आईवडील झाल्यानंतर दीपिका आणि रणवीरची पहिल्यांदाच झलक त्यांच्या चाहत्यांना पाहायला मिळत आहे. व्हिडीओवर चाहत्यांकडून लाइक, कमेंट्स आणि शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. 

दीपवीरच्या लक्ष्मीची झलक दिसली?

व्हायरल व्हिडीओमध्ये दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहने पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान केल्याचे दिसत आहे. कारमध्ये त्यांचे पालक देखील होते. पण त्यांच्या लेकीची झलक दिसत नाहीय, ज्यामुळे चाहते निराश झाले आहेत. पण दीपिकाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्याने चाहते प्रचंड खूश आहेत. 

(नक्की वाचा: Punha Ekda Saade Maade Teen: पुन्हा एकदा साडे माडे तीन सिनेमाचा पार पडला मुहूर्त, रातोरात स्टार झालेली अभिनेत्री झळकणार?)

Advertisement

शाहरुख खान दीपिकाच्या भेटीला  

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड किंग शाहरुख खानने हॉस्पिटलमध्ये जाऊन दीपिकाची भेट घेतली, हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. दरम्यान दीपवीर त्यांचा फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर कधी शेअर करणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

लेकीच्या जन्मानंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहने आईबाबा झाल्याची अधिकृत माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती आणि आपल्या लेकीचे स्वागत केले होते. 

Advertisement

(नक्की वाचा: सोशल मीडियावर Bigg Boss Boycott ट्रेंड; आर्याला घराबाहेर काढल्यामुळे चाहत्यांमध्ये संताप!)

दीपिकाने इन्स्टाग्राम अकाऊंटमध्ये केला मोठा बदल

हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळण्यापूर्वी दीपिकाने तिच्या Instagram Accountमध्ये मोठा बदल केला आहे. दीपिकाने इन्स्टाग्रामचे बायो बदलले आहे आणि मातृत्वाशी संबंधित माहिती अपडेट केली आहे. 'फीड, बर्प, स्लीप, रिपीट.(Feed.Burp.Sleep.Repeat.) असे तिने इन्स्टा बायोमध्ये लिहिले आहे.

Advertisement

Photo Credit: Deepika Padukone Instagram

(नक्की वाचा: Phullwanti Title Track: फुलवंती सिनेमातील टायटल ट्रॅक रिलीज, प्राजक्ता माळी रंभा जणू देखणी)