Deepika Padukone Photos: दीपिका पादुकोणची दुसरी प्रेग्नेंसी ते चिमुकली दुआ, मातृत्वाच्या प्रवासातील 8 खास फोटो

Deepika Padukone Photos: अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या मातृत्वाच्या प्रवासातील सात खास क्षणांचा आढावा या लेखातून जाणून घेऊया...

जाहिरात
Read Time: 2 mins
"Happy Mother's Day 2026: दीपिका पादुकोणच्या मातृत्वाच्या प्रवासातील खास क्षण"

Deepika Padukone Photos: बॉलिवूडची अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या दुसऱ्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. पहिली प्रेग्नेंसी, लेक दुआचा जन्म ते दुसऱ्या प्रेग्नेंसीची घोषणा करण्यापर्यंतचा प्रवास तिने चाहत्यांसोबत शेअर केला. दीपिका पादुकोणच्या जीवनातील हे महत्त्वाचे क्षण आपण या लेखातून जाणून घेऊया. 

दीपिकाच्या मातृत्वाच्या प्रवासातील 7 खास क्षणांवर टाकलेली ही एक नजर:

1. दुसऱ्या प्रेग्नेंसीची घोषणा 

दीपिका आणि रणवीरने त्यांच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीची घोषणा करून चाहत्यांना सुखद धक्का दिला. या घोषणेच्या फोटोमध्ये त्यांची लेक दुआच्या हातामध्ये प्रेग्नेंसी टेस्ट किट दिसली. ही हृदयस्पर्शी पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती.

Advertisement

2. लाडकी लेक 'दुआ'ची झलक

दीपिका आणि रणवीरने आपल्या मुलीचे नाव 'दुआ' ठेवल्याचे जाहीर केले. तिला "आमच्या प्रार्थनांचे उत्तर" (Answer to our prayers) असे म्हणत त्यांनी लिहिलेली पोस्ट लाखो चाहत्यांच्या मनाला स्पर्श करून गेली.

3. रणवीरसोबतचे खास मॅटर्निटी शूट

या जोडीचे ब्लॅक अँड व्हाइट थीमचे मॅटर्निटी फोटोशूट इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाले होते. या फोटोंद्वारे पालकत्त्वाच्या नव्या प्रवासात पाऊल ठेवतानाचा त्यांचा उत्साह अधोरेखित झाला.

4. दुआच्या पहिल्या वाढदिवसाला स्वतः तयार केला केक 

मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त दीपिकाने स्वतः केक तयार करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. तिच्यातील एका जबाबदार आणि प्रेमळ आईची ही झलक चाहत्यांना खूप आवडली. यावर रणवीरने "बेस्ट मम्मा!" अशी कमेंट करत तिचे कौतुक केले होते.

5. पहिले दिवाळी सेलिब्रेशन

पारंपरिक पेहरावात दीपिका, रणवीर आणि चिमुकली दुआ यांचे पहिले दिवाळी सेलिब्रेशन खूप खास होते. या फोटोंमध्ये कुटुंबाचा आनंद आणि पालक म्हणून असलेल्या जबाबदारीकडे समर्पण स्पष्टपणे दिसून आले.

Advertisement

6. प्रेग्नेंसी ग्लो 

पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील दीपिकाचा एक फोटो प्रचंड चर्चेत राहिला होता. या फोटोमधील तिच्या चेहऱ्यावरील प्रेग्नेंसी ग्लो पाहून चाहते फिदा झाले होते. तिने या फोटोला "सनशाइन स्टेट ऑफ माइंड" असे कॅप्शन दिले होते.

7. पार्टी लुक 

जांभळ्या रंगाच्या साडीतील दीपिकाचा लुक आयकॉनिक ठरला. "बाळाला पार्टी करायची आहे" (Baby wants to party!!!) असे मजेशीर कॅप्शन देत तिने गरोदरपणातील आपला कमाल अंदाज चाहत्यांसोबत शेअर केला होता.

Advertisement

8. दीपिका पादुकोण सध्या काय करतेय?

कामाबाबत सांगायचे झाले तर दीपिकाकडे सध्या दोन मोठे सिनेमे आहेत. ती शाहरुख खानसोबत 'किंग' (King) मध्ये दिसणार आहे, तर दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत ती 'राका' (Raaka) मध्ये झळकणार आहे.