Pooja Bhatt Husband Photos: पूजा भटचा पती कोण आहे? काय करतो? पाहिले का त्याचे हे 10 फोटो

Pooja Bhatt Husband Photos: पूजा भटने 2003मध्ये लग्न केले. तिचा पती नेमके काय करतो, माहितीय का?

जाहिरात
Read Time: 2 mins
Pooja Bhatt Husband Photos: पूजा भटच्या पतीचे फोटो पाहिले का?

Pooja Bhatt Husband Photos: अभिनेत्री पूजा भटने तिच्या काळामध्ये कित्येक हिट सिनेमे बॉलिवूड इंडस्ट्रीला दिले आहेत. 24 फेब्रुवारी 1972 साली पूजा भटचा मुंबईमध्ये जन्म झाला. पूजा भट दिग्दर्शक-निर्माते महेश भट आणि किरण भट यांची लेक आहे. 1989मध्ये "डॅडी" सिनेमाद्वारे तिने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले आणि "दिल है कि मानता नहीं", "सडक" यासारख्या सिनेमांद्वारे तिने स्वतःची ओळख निर्माण केली. 90च्या दशकात बोल्ड आणि संवेदशनशील भूमिकांसाठी पूजा ओळखली जाऊ लागली. यानंतर तिने 'तमन्ना', 'जख्म' यासारख्या सिनेमांची निर्मिती तर "पाप" सिनेमाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं. खासगी आयुष्याबाबत सांगायचे झाले तर पूजाने 2003 मध्ये मनीष मखीजासोबत लग्न करुन 2014मध्ये घटस्फोट घेतला. यानंतर सिनेमाच्या दुनियेपासून काही काळ दूर राहिल्यानंतर पूजाने 2021मध्ये "बॉम्बे बेगम्स" (Bombay Begums) या वेब सीरिजद्वारे कमबॅक केले. 

24 फेब्रुवारी 1972मध्ये महेश भट आणि किरण भट यांच्या घरी पूजाचा जन्म झाला. 

पूजाने 2003मध्ये VJ‑बिजनेसमॅन मनीष मखीजासोबत (Manish Makhija) लग्न केले, 2014मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.   

(नक्की वाचा: Actor Brahmanandam News: 38 वर्षात 1000 सिनेमे केले, अभिनयात काही तोड नाही; नेटवर्थमध्येही भल्याभल्यांना सोडले)

पूजा अभिनेता रणवीर शोरेसोबत लिव्ह‑इन रिलेशनशिपमध्येही होती, यादरम्यान तिने रणवीरवर घरगुती हिंसाचाराचेही आरोप केले होते. 

पूजा भटने मॉडलिंगद्वारे करिअरची सुरुवात केली होती. यानंतर तिने महेश भट यांच्या 'Daddy' (1989) सिनेमाद्वारे अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं आणि फिल्मफेअर अवॉर्ड देखील जिंकला होता.  

Advertisement

(नक्की वाचा: स्मृती इराणींच्या पतीचे 10 फोटो, पाचवा पाहून म्हणाल: तुलसीच्या Reel Life मिहिरलाही टाकलं मागे)

'दिल है के मानता नहीं' या सिनेमामध्ये तिची भूमिका महत्त्वपूर्ण होती, या सिनेमाद्वारे तिच्या कारर्किदीस चांगलं वळण प्राप्त झाले. 

पूजाने 1996मध्ये स्वतःची प्रोडक्शन कंपनी सुरू केली. 2003मध्ये पाप सिनेमाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात एण्ट्री केली आणि कित्येक बोल्ड विषयांवर तिने सिनेमे तयार केले.  

Advertisement

पूजाने 2021मध्ये  'बॉम्बे बेगम्स' या वेब सीरिजद्वारे कमबॅक केले, 2023मध्ये बिग बॉस OTTमध्ये ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट तिची सावत्र बहीण आहे, पण दोघींमध्ये चांगले बाँडिंग आहे.  

पूजा भट बॉलिवूड इंडस्ट्रीपासून सध्या दूर आहे, पण सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रिय असते.  

वर्ष 2020मध्ये रीलिज झालेल्या सडक 2 सिनेमामध्ये पूजा भट शेवटची दिसली होती. 1991मधील सुपरहिट ठरलेल्या 'सडक' सिनेमाचा हा सीक्वेल होता, पण हा सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही.  

Advertisement