सारा अली खानसोबत काय घडलं? विमान प्रवासात संतापली अभिनेत्री, Inside Video

Sara Ali Khan Viral Video :अभिनेत्री सारा अली खान सध्या चित्रपटामुळे नाही तर वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे.

Advertisement
Read Time: 1 min
S
मुंबई:

Sara Ali Khan Viral Video  अभिनेत्री सारा अली खान सध्या चित्रपटामुळे नाही तर वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये साराचं वेगळंच रुप पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये सारा रागानं लाल झालेली दिसत आहे.विमान प्रवासातील हा व्हिडिओ वेगानं व्हायरल होत आहे. त्यामध्ये सारा एका एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यावर संतापलेली दिसत आहे. 

(नक्की वाचा : अभिषेक-ऐश्वर्यामुळे चर्चेत आलेला Grey Divorce प्रकार काय आहे? तो का घेतला जातो? )

इन्स्टाग्रामवर शेअर झालेल्या या व्हिडिओत सारा अली खान गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये विमानात बसलेली आहे. साराजवळ एअरलाईन्सचे अनेक कर्मचारी उभे आहेत. या व्हिडिओमध्ये ती रागानं जागेवरुन उठते आणि कदाचित वॉशरुमच्या दिशेनं जाते. सारासोबत विमानात अशी गोष्ट घडली की त्यामुळे ती नाराज झालीय, असं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहलं आहे. साराच्या महागड्या ड्रेसवर एअरहोस्टेसनं ज्यूस सांडलं त्यानंतर हा सर्व प्रकार घडला. 

लोकांना वेगळीच शंका

हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. त्यावर अनेक जण प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ एखादा चित्रपट किंवा जाहिरातीमधील शूटचा आहे, अशी शंका अनेकांनी व्यक्त केली आहे. तर काही जण हा व्हिडिओ खरा असल्याचा दावा करत आहेत. हा व्हिडिओ खरा आहे की एखाद्या शूटचा भाग आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

Advertisement