
Tamannaah Bhatia Vijay Verma breakup : बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता विजय वर्मा यांच्यात ब्रेकअप झाल्याची चर्चा सिनेवर्तुळात सुरू आहे. दोघेही दोन वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. त्यांनी सुरुवातीलाच आपलं नातं सार्वजनिकपणे जाहीरही केलं होतं. त्या दोघांकडे एक पॉवर कपल म्हणून पाहिलं जात होतं. दोघेही यशाच्या शिखरावर आहेत. दरम्यान त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर आल्याने चाहतेही नाराज झाले आहेत.
नक्की वाचा - Anora Oscar : देहविक्रय करणाऱ्या तरुणीच्या जीवनावरील चित्रपटाने ऑस्करमध्ये रचला इतिहास; OTT वर कुठे पाहता येईल?
काही बातम्यांनुसार, विजय आणि तमन्ना वेगळे झाले आहेत असे दोघांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलं आहे. दोघेही या विषयावर फारसे बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत. आता दोघांनीही चांगले मित्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. ते एकमेकांचा सन्मान ठेवतात आणि त्यांच्यामध्ये काहीही कटूता नाही. दोघेही आपल्या करिअरकडे लक्ष्य देऊ इच्छितात. दरम्यान अद्याप दोघांनीही अधिकतपणे ब्रेकअपच्या बातम्यांवर प्रतिक्रिया दिलेली नाही.
तमन्ना भाटिया आणि वर्मा यांनी 2023 मध्ये लस्ट स्टोरीज-२ च्या रिलिजदरम्यान आपलं नातं सार्वजनिक केलं. एका मुलाखतीदरम्यान विजय वर्मा यांनी तमन्नासोबत डेट करीत असताना लोकांच्या प्रतिक्रिया पाहून ते हैराण झाल्याचं सांगितलं होतं. दोघांनीही सोशल मीडियावरुन एकमेकांसोबतचे फोटो डिटिल केल्याचंही सांगितलं जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world