आमिर खानने स्वीकारली आयुष्यातील ती चूक, गौरी स्प्रॅटबाबत केले मोठे विधान; लग्न न टिकण्याचंही सांगितलं कारण

Aamir Khan: अभिनेता आमिर खानने आपल्या खासगी आयुष्यातील चुका, गौरी स्प्रॅटसोबतचे नाते आणि कुटुंबाला वेळ न दिल्याबद्दलच्या पश्चात्तापावर मोकळेपणाने भाष्य केले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
"Aamir Khan: आमिर खानने खासगी आयुष्याबाबत केले मोठे विधान"
PTI

Aamir Khan: बॉलिवूड अभिनेता आमिर खान गेल्या काही काळापासून त्याचे खासगी आयुष्य आणि नात्यांविषयी मोकळेपणाने बोलताना दिसत आहे. नुकत्याच एका मुलाखतीत त्याने पुन्हा एकदा गौरी स्प्रॅटसोबतच्या नात्याबाबत आणि रीना दत्तासोबतच्या मोडलेल्या संसारावर भाष्य केले. आपल्या मनातील भावना आणि आयुष्यातील सध्याची स्थिती यावर त्यांनी 'नवभारत टाइम्स' या वृत्तसंस्थेशी बोलताना मनमोकळा संवाद साधला. नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत, आमिरने मुलं-नात्यांबाबत आणि प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत त्याला अखेर परिपूर्ण का वाटते? याबाबत माहिती सांगितली.

आमिर खानचे खासगी आयुष्याबद्दलचे मत | Aamir Khan News

आमिर खानने सांगितले की, पार्टनर गौरी स्प्रॅटसोबत तो खूप आनंदी आहे आणि गौरी त्याच्या आयुष्यात असल्याने तो स्वतःला नशीबवान समजतो. याबाबत आमिर म्हणाला की, "मी खूप नशीबवान आहे की मला गौरी भेटली आणि आमचे नाते तयार झाले. ती खूप चांगली व्यक्ती आहे आणि तिच्यासोबत मला मानसिक शांतता मिळते. माझे किरण राव आणि रीना दत्ता यांच्यासोबतचे नातेही गंभीर होते, तरीही काही गोष्टी जुळून आल्या नाहीत. गौरी माझ्या आयुष्यात आल्यामुळे आता मला पूर्ण झाल्यासारखे वाटते."
(नक्की वाचा: 14व्या वर्षी वृद्धाशी लग्न! 1983मध्ये 44 सिनेमांमध्ये झळकली, अभिनेत्रीची शेवटची चिठ्ठी वाचून डोळ्यात येईल पाणी)

Advertisement

स्वतःच्या चुकांची कबुली आणि प्रगती

आपल्या खासगी आयुष्यातील प्रगतीबाबत बोलताना आमिर म्हणाला की, आपल्या चुका स्वीकारल्यामुळेच त्याला पुढे जाण्यास मदत झाली आहे. आमिर म्हणाले, "मी जसा आहे, तसाच आहे. आयुष्यात प्रत्येक माणूस चुका करतो, कोणीही परिपूर्ण नसतो. जर तुम्ही तुमची चूक समजून घेतली आणि ती स्वीकारली, तर तुम्ही लहान होत नाही. मी माझ्या आयुष्यातील चुकांमधून शिकतोय आणि त्या पुन्हा न करण्याची मी नेहमीच काळजी घेईन अन् एक व्यक्ती आणि एक अभिनेता म्हणून पुढे वाटचाल करेन. हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा मी माझ्या चुका समजून घेऊन त्या मान्य करेन. मी खूप स्पष्टवक्ता आहे; मला जे वाटतं ते मी बोलून दाखवतो."

(नक्की वाचा : Bollywood News: बॉलिवूडच्या बड्या कोरिओग्राफरचं वयाच्या 15व्या वर्षी धर्मपरिवर्तन, शिवलिंगाबाबत केला खुलासा)

आमिर खानने व्यक्त केला आयुष्यातील सर्वात मोठा पश्चात्ताप

आमिर खानने प्रांजळपणे मान्य केले की, आपल्या जवळच्या माणसांना पुरेसा वेळ न देणे ही त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. अनेक दशके आयुष्यात इतर सर्व गोष्टींपेक्षा कामालाच अधिक प्राधान्य होते. एक चूक जी मी सुधारण्यास सुरुवात केलीय, ती म्हणजे मी आपल्या जवळच्या लोकांना, नातेवाईकांना जास्त वेळ देऊ शकत नव्हतो. मी मागील 30-35 वर्षांपासून केवळ काम, सिनेनिर्मिती आणि अभिनय इत्यादी गोष्टींमध्ये गुंतलो होतो. COVID महामारीच्या काळात मला आयुष्याकडे पुन्हा एकदा पाहण्याची संधी मिळाली. त्यावेळेस काम थांबले होते, तेव्हा मला जाणीव झाली की आयुष्यातील खूप महत्त्वाचे क्षण गमावले आहेत, जे आता पुन्हा येणार नाहीत."  

Photo Credit: aamir khan

आमिर खानचे पहिले लग्न रीना दत्ताशी झाले होते, त्यांना इरा आणि जुनैद ही दोन मुले आहेत. वर्ष 2002 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर वर्ष 2005 मध्ये आमिरने सिनेनिर्माती किरण रावशी लग्न केले आणि वर्ष 2021 मध्ये दोघं विभक्त झाले. आता ते दोघं मिळून आपला मुलगा आझादचा सांभाळ करत आहेत.