Ganesh Chaturthi 2025: गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू होत्या. सुनीता अहुजाने कोर्टामध्ये घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्याचंही म्हटलं जात होतं. पण घटस्फोटाच्या चर्चांना गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीताने पूर्णविराम दिल्याचं दिसतंय.
Photo Credit: Varinder Chawla
गणेश चतुर्थीनिमित्त गोविंदा आणि सुनीता एकत्र दिसले. दोघांनीही लाडक्या गणपतीचे निवासस्थानी जल्लोषात स्वागत केले.
Photo Credit: Varinder Chawla
सुनीता आणि गोविंदाने घटस्फोटाच्या चर्चांना दिला पूर्णविराम
अलिकडेच सोशल मीडियावर दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. सुनीता अहुजाने गोविंदावर फसवणूक केल्याचा आरोप करत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचंही म्हटलं जात होते.
Photo Credit: Varinder Chawla
पण गोविंदा आणि सुनीता यांनी एकत्र गणेश चतुर्थी साजरी केली, एकत्रित बाप्पाचे स्वागत करुन विभक्त होण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय. विशेष म्हणजे सुनीता आणि गोविंदाने सणानिमित्त एकमेकांशी मॅचिंग असा पेहराव परिधान केला होता.
Photo Credit: Varinder Chawla
सुनीता आणि गोविंदाचा मॅचिंग पेहराव
सुनीताने मरुन रंगाची सिल्क फॅब्रिकची साडी नेसली होती. पारंपरिक वेशभूषा परिधान करुन सुनीताने सुंदर दागिनेही घातले होते. गोविंदानेही मरुन रंगाचा कुर्ता परिधान केला होता. या जोडप्याने पापाराझींमध्ये मिठाईचंही वाटप केले. दोघंही एकत्रित आनंदी दिसत होते.
Photo Credit: Varinder Chawla