Dharmendra Family: 2 पत्नी, 2 मुलं, 4 लेकी आणि 13 नातवंड! धर्मेंद्र यांचे इतकं मोठं आहे कुटुंब

Dharmendra Family: दोन लग्न करणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे कुटुंब प्रचंड मोठे आहे. कुटुंबामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे, जाणून घेऊया माहिती...

जाहिरात
Read Time: 2 mins
"Dharmendra Family: धर्मेंद्र यांच्या कुटुंबामध्ये कोणकोण आहे?"

Dharmendra Family: वयाच्या 89व्या वर्षीही धर्मेंद्र सिनेसृष्टीमध्ये शानदार पद्धतीने काम करत आहेत. आगामी सिनेमा 'झक्कीस'मध्येही ते झळकणार आहेत. बिग बी अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा सिनेमामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. धर्मेंद्र यांनी त्यांच्या सहा दशकांहून अधिक काळ सिनेसृष्टीत भरीव योगदान दिलंय, 300 हून जास्त सिनेमांमध्ये त्यांनी काम केलंय. दरम्यान व्यावसायिक तसंच खासगी जीवनामुळेही धर्मेंद्र चर्चेत राहिले आहेत. दोन वेळा लग्न केलेल्या या दिग्गज अभिनेत्याचे कुटुंबही भलमोठं आहे. धर्मेंद्र यांना दोन मुलं आणि चार मुली अशी सहा अपत्यं आहेत. त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य अमेरिकेतही वास्तव्यास आहेत. धर्मेंद्र यांच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती जाणून घेऊया... 

धर्मेंद्र यांची पहिली पत्नी आणि कुटुंब

धर्मेंद्र यांनी वयाच्या 19व्या वर्षी प्रकाश कौर यांच्यासोबत लग्न केले होते. त्यावेळेस धर्मेंद्र अभिनय क्षेत्रामध्ये सक्रिय नव्हते. धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांची चार मुलं आहेत. बॉबी देओल, सनी देओल, विजेता आणि अजीता अशी मुलांची नावं आहेत. सनी देओलला करण आणि राजवीर अशी दोन मुलं आहेत तर आर्यमान - धरम देओल ही बॉबीची मुलं आहेत. धर्मेंद्र यांची मुलगी विजेताला एक मुलगा आणि एक मुलगी आहे तर अजीताला दोन मुली आहेत. अजीता आणि विजेता सिनेसृष्टीपासून दूर आहेत. अजीता शिक्षिका आहेत, त्यांचे पती किरण चौधरी अमेरिकेमध्ये डेंटिस्ट आहेत. तर विजेता पती-कुटंबासह दिल्लीमध्ये स्थायिक आहेत.

(नक्की वाचा: Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना डिस्चार्ज मिळाला! घरी कशी काळजी घेतली जाणार? प्रकृतीबाबत डॉक्टरांची मोठी माहिती)

धर्मेंद्र यांच्या सुना

धर्मेंद्र यांच्या सुनांबाबत सांगायचे झाले तर सनीने अँग्लो इंडियन असलेल्या पूजाशी लग्न केले होते, तर बॉबीने तान्या आहुजाशी लग्नगाठ बांधली. सनीचा मुलगा करणने गर्लफ्रेंड दिशा आचार्यसोबत लग्न केलं. 

Advertisement

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचे लग्न

धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी दुसरे लग्न केले. यावेळेस धर्मेंद्र चार मुलांचे वडील होते आणि ते ड्रीम गर्लच्या प्रेमात पडले. हेमा आणि धर्मेंद्र यांनी 1980मध्ये लग्न केले. त्यांना ईशा देओल आणि अहाना देओल या दोन मुली आहेत. ईशा आणि अहानाला अभिनय क्षेत्रात फारसं यश मिळालं नाही.

Advertisement

(नक्की वाचा: Dharmendra And Hema Malini: हेमा मालिनींना या नावाने हाक मारतात सनी देओल आणि बॉबी देओल, ड्रीमगर्लने केला होता सर्वांसमोर खुलासा)

ईशाने बिझनेसमन भरत तख्तानीसोबत लग्न केले होते, पण त्यांचा घटस्फोट झाला. ईशाला एक मुलगी आहे. अहानाने वैभव वोहराशी लग्न केलंय या जोडप्याला तीन मुलं आहेत, यामध्ये जुळ्या बाळांचा समावेश आहे. एकूण सहा मुलं, दोन सुना आणि 13 नातवंडांचा धर्मेंद्र यांच्या कुटुंबात समावेश आहे. 

Advertisement