Jeetendra Shocking Video Viral: जीतेंद्र यांचा शॉकिंग Video व्हायरल, मुलगा तुषार कपूरने शेअर केले हेल्थ अपडेट

Jeetendra Shocking Video: ज्येष्ठ अभिनेते संजय खान यांच्या पत्नी झरीन खान यांच्यासाठी आयोजित केलेल्या प्रार्थना सभेदरम्यान दिग्गज अभिनेते जीतेंद्र यांच्यासोबत एक अपघात घडला.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Jeetendra Shocking Video: जीतेंद्र यांचा शॉकिंग व्हिडीओ व्हायरल"

Jeetendra Shocking Video Viral: ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते संजय खान यांची पत्नी झरीन खान यांचे 7 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झाले. 10 नोव्हेंबर रोजी झरीन यांच्यासाठी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये बॉलिवूडमधील कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती. दिग्गज अभिनेते जीतेंद्र हे देखील सहभागी झाले होते.

पण सभेस्थळी जीतेंद्र यांचा तोल जाऊन ते अतिशय वाईट पद्धतीने खाली पडले. जीतेंद्र हे 83 वर्षांचे आहेत. सभास्थळी जात असताना जीतेंद्र यांचा पाय अडखळला आणि ते खाली पडले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. जीतेंद्र पडल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांना तातडीने मदत केली.  

मुलगा तुषार कपूरने शेअर केले हेल्थ अपडेट्स

सुदैवाने जीतेंद्र यांना गंभीर दुखापत झालेली नाही. पण वयोमानानुसार ते ज्या पद्धतीने खाली पडले ते पाहून चाहते काळजी व्यक्त करू लागले. यानंतर गंभीर दुखापतीमुळे जीतेंद्र यांची प्रकृती बिघडल्याच्या अफवा पसरू लागल्या होत्या, पण त्यांचा मुलगा तुषार कपूरने दुखापतीच्या अफवांचे वृत्त फेटाळून लावले. रिपोर्ट्सनुसार, वडिलांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती तुषारने सांगितली.

Advertisement

(नक्की वाचा: Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना डिस्चार्ज मिळाला! घरी कशी काळजी घेतली जाणार? प्रकृतीबाबत डॉक्टरांची मोठी माहिती)

दरम्यान झरीन खान यांच्या प्रार्थना सभेमध्ये राणी मुखर्जी, हृतिक रोशन, सबा आझाद, जॅस्मिन भसीन, मलायका अरोरा, जॅकी श्रॉफ, हेलन, नील नितिन मुकेश, ईशा देओल, सलीम खान, फरदीन खान यासह अन्य कलाकारांनी उपस्थिती दर्शवून श्रद्धांजली वाहिली.  

Advertisement