Bollywood News: शाहरुख खानने आपले 2 अपार्टमेंट दिले भाड्याने, 3 वर्षात मिळणारं भाडं ऐकून डोळे फिरतील

शाहरुखच्या संपत्ती बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. शाहरुखचे पाली हील या भागात दोन अलिशान ड्युप्लेक्स अपार्टमेंट आहेत. ते त्याने भाड्याने दिले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

शाहरुख खान हा त्याचे चित्रपट आणि भूमीकांमुळे चर्चेत असतोच. पण त्याच्या आर्थिक कमाईबाबतही अनेकांना उत्सुकता असते. त्याची आर्थिक उलाढाल ही प्रचंड आहे. शिवाय त्याची गुंतवणूक कुठे कुठे आहे. त्याची प्रॉपर्टी किती आहे, याची ही उत्सुकता असते.अशा स्थितीत शाहरुखच्या संपत्ती बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. शाहरुखचे पाली हील या भागात दोन अलिशान ड्युप्लेक्स अपार्टमेंट आहेत. ते त्याने भाड्याने दिले आहेत. जवळपास 3 वर्षासाठी ते भाड्याने दिले आहेत. त्यातून त्याला मिळणारं भाडं ऐकून तुम्हीचे डोळे फिरल्या शिवाय राहाणार नाहीत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हे दोन्ही अपार्टमेंट तीन वर्षासाठी शाहरुखने भाड्याने दिले आहेत. त्यातून त्याला तब्बल 8 कोटी 67 लाख रुपये भाडं मिळणार आहे. जैपकी डॉट कॉमने ही माहिती दिली आहे. हे दोन्ही आपर्टमेंट पूजा कासा या बिल्डींगमध्ये आहेत. पहिल्या दुसऱ्या मजल्यावर एक अपार्टमेंट आहे. तर सातव्या आणि आठव्या मजल्यावर दुसरं अपार्टमेंट आहे. त्यातील एक अपार्टमेंट जॅकी भगनानी आणि त्यांची बहीण दीपशिखा देशमुख यांनी भाड्याने घेतले आहे. ते  11.54 लाख रुपये महिन्याचे भाडे देतात. त्यासाठी त्यांनी जवळपास 32.97 लाख रुपये डिपॉजिट ही दिले आहे. 3 वर्षासाठी हा करार करण्यात आला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - CIDCO Lottery 2025: 'माझे पसंतीचे सिडकोचे घर' मिळाले, आता पुढे काय? 'या' गोष्टी करणं बंधनकारक

तर दुसरे ड्युप्लेक्स अपार्टमेंट चित्रपट निर्माता वासु भगनानी यांनी भाड्याने घेतला आहे. त्यासाठी भगनानी शाहरुखला दर महा 12.61 लाख रुपये भाडं देतात. 3 वर्षासाठी त्यांनी 36 लाख रुपयाचं डिपॉजिट ही शाहरुखला दिलं आहे.  14 फेब्रुवारी 2025 ला हा करार करण्यात आला आहे. त्यामुळे शाहरुख त्यांच्या चित्रपटातून पैसे कमवत असतोच, पण त्याने घेतलेल्या अलिशान अपार्टमेंटच्या माध्यमातूनही शाहरुखला लाखो रूपये मिळत आहेत हे आता स्पष्ट झालं आहे.

ट्रेंडिंग बातमी - Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत, दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा

शाहरुख खानच्या या नव्या कराराची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शाहरुख खान हा ज्या पद्धतीने अभिनय क्षेत्र असो की निर्माता म्हणून काम असतो त्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. त्याच प्रमाणे त्याने घर खरेदीमध्ये ही मोठी गुंतवणूक केली आहे. त्यातून त्याला परतावा ही मिळत आहे. हेच आता या दोन ड्युप्लेक्स अपार्टमेंटच्या माध्यमातून समोर आले आहे.   

Advertisement