Bollywood News: 200 कोटींची मालकीण! तरीही 'या' अभिनेत्रीला स्वत: करावी लागते दिवाळीची साफसफाई

तिची संपत्ती सुमारे 200 कोटी रुपये आहे. तरीही ती स्वतः आपल्या घराची साफसफाई करत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

दिवाळीच्या (Diwali) निमित्ताने राजे-महाराजे असोत किंवा सामान्य नागरिक, प्रत्येकाच्या घरामध्ये सध्या साफसफाईचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रकाशाचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उत्सवाच्या स्वागतासाठी प्रत्येक जण आपल्या घरातील स्वच्छता करण्यात व्यस्त आहे. अशीच एक अभिनेत्री आहे, जी शाही घराण्यातील (Royal Family) आहे. ऐवढच नाही तर तिची संपत्ती सुमारे 200 कोटी रुपये आहे. तरीही ती स्वतः आपल्या घराची साफसफाई करत आहे. विशेष म्हणजे, या अभिनेत्रीने आपल्या चातुर्याने साफसफाईच्या या कामाला चक्क वर्कआउटमध्ये (Workout) रूपांतरित केले आहे.

ज्या शाही घराण्यातील अभिनेत्रीबद्दल आपण बोलत आहोत, ती आहे सोहा अली खान. सोहाने स्वतः एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती वर्कआउट करताना दिसत आहे. परंतु तिच्या हात आणि पायांखाली 'मॉप्स्' (Mops) अर्थात साफसफाईचे कपडे आहेत. ती आरशासमोर उभी राहून वर्कआउट करत असताना, तिच्या हातांखाली असलेल्या कपड्यांनी काच (Glass Cleaning) साफ होत आहे. तसेच, जेव्हा ती पायांचा व्यायाम (Leg Workout) करते, तेव्हा तिच्या पायांखाली दडलेल्या कपड्यांनी जमिनीची स्वच्छता होत आहे.

नक्की वाचा - Manache Shlok: 'मनाचे श्लोक' चित्रपटाचे नाव अखेर बदलले, आता नव्या नावासह नव्या तारखेला होणार प्रदर्शित

सोहा अली खानने या व्हिडिओला अत्यंत मजेदार कॅप्शन दिले आहे. तिने लिहिले आहे की, ‘प्री-दिवाळी क्लीनिंग. क्लीनिंग, मॉपिंग आणि थोडासा वर्कआउट सोबतच!' असं कॅप्शन तिने दिले आहे. त्यामुळे एक अनोखी शक्कल सोहाने साफसफाई करताना अवलंबली आहे. नेतकऱ्यांनीह त्यामुळे तिचे कौतूक केले आहे. तर काहींनी टिका केली आहे. प्रत्येक जण अशा प्रकारचे फंडे काढत असतो. सोहाचा हा फंडा मात्र सगळ्यां पेक्षाच वेगळा म्हणावा लागेल. तिचा हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पाहीला आहे. 

नक्की वाचा - Bollywood News: झिंगाट होवून सैराट! दारुच्या नशेत हॉटेलमध्ये सापडला बॉलिवूडचा मराठी स्टार

सोहा अली खान ही अभिनेता सैफ अली खानची (Saif Ali Khan) बहीण आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांची ती कन्या आहे. ती नवाब पटौदींच्या (Nawab Pataudi) कुटुंबातील आहे. शाही घराण्याची ही कन्या स्वतः 200 कोटी रुपयांची मालकीण आहे. तिच्या चाहत्यांना तिची ही 'फिटनेस रुटीन' (Fitness Routine) पाहून आश्चर्य वाटत आहे. एका चाहत्याने 'मॅडम, तुम्ही कमाल केली' असे लिहिले आहे, तर दुसऱ्याने 'स्वच्छतेची ही पद्धत खूपच छान आहे. दिवाळीची दिवाळी आणि साफसफाईची साफसफाई' अशी प्रतिक्रिया ही काहींनी दिली आहे.

Advertisement