देशभरात शारदीय नवरात्रीत महाअष्टमी उत्साहात साजरी झाली. अष्टमीला घरात सुख-समृद्धी येण्यासाठी आठ कन्यांचे पूजन करण्याची परंपरा आहे. बॉलिवूड अभिनेता वरुण धवन यानेही त्याच्या घरी महाअष्टमीचे पूजन केले आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले, पण या पूजनाच्या पद्धतीमुळे अनेकांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे.
कन्या पूजनाच्या फोटोवर टीका
वरुण धवनने मंगळवारी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो पोस्ट केले. या फोटोंमध्ये तो छोट्या मुलींसोबत दिसत आहे. या सर्व मुली शाळेच्या ड्रेसमध्ये आहेत आणि वरुण धवन कॅज्युअल कपड्यांमध्ये त्यांच्यासोबत जेवण करत आहे. यावेळी त्याने महाअष्टमीच्या जेवणाची थाळी देखील शेअर केली आहे, ज्यामध्ये हलवा, भाजी, खीर आणि पुरी आहे.
वरुणने कॅप्शनमध्ये, "अष्टमीच्या शुभेच्छा" असे लिहिले आहे. यावेळी काही युजर्सला वरुन धवनचे कन्या पूजन करण्याची पद्धत आवडली नाही आणि त्यांनी टीकेला सुरुवात केली.
प्लास्टिकच्या प्लेटवरून वाद
वरुण धवनवर टीका करण्याचे मुख्य कारण म्हणजे मुलींना जेवण वाढण्यासाठी वापरलेल्या प्लेट्स. युजर्सचे म्हणणे आहे की, अभिनेता स्वतः स्टीलच्या ताटात जेवण करत आहे, पण छोट्या मुलींना प्लास्टिकच्या किंवा कागदी प्लेटमध्ये जेवण दिले आहे.
एका युजरने लिहिले, "सर, तुम्ही स्वतः स्टीलच्या प्लेटमध्ये जेवण करत आहात आणि मुलांना प्लास्टिकच्या ताटात जेवण देत आहात, हे पूर्णपणे चुकीचे आहे." दुसऱ्या युजरने लिहिले, "मुलांची थाळी वेगळी आहे? पेपर वाली थाळी.. ही तर चुकीची गोष्ट आहे."