अरिजीत सिंगच्या पत्नीचे 5 फोटो, घटस्फोटित आणि एका मुलीची आई; बालपणीच्या मैत्रिणीसोबत का थाटला दुसऱ्यांदा संसार

अरिजीत सिंग आणि कोयल रॉयची प्रेमकहाणी एखाद्या सिनेमासारखी आहे. बालपणीची मैत्री, कोयलचा पहिला घटस्फोट आणि अरिजीतने स्वीकारलेली जबाबदारी; वाचा त्यांच्या प्रवासाबाबत माहिती.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Arijit Singh Wife: अरिजीत सिंगच्या पत्नीचे 5 फोटो"
Arijit Singh Instagram

Arijit Singh Wife: प्रसिद्ध गायक अरिजीत सिंग केवळ सुमधुर आवाजासाठीच नव्हे तर त्याच्या साध्या जीवनशैलीसाठीही ओळखला जातो. अरिजीत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण यावेळेस कोणत्याही गाण्यामुळे तो चर्चेत नाहीय तर त्याची पत्नी कोयल रॉयचे सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. पण अनेकांना ठाऊक नाहीय की कोयल ही अरिजीतची पहिली नाही तर दुसरी पत्नी आहे. या दोघांची लव्ह स्टोरी एखाद्या सिनेमाच्या कथेसारखीच आहे, त्यांच्यातील बालपणीच्या मैत्रीचे रूपांतर लग्नात झाले. कोयल घटस्फोटित असून तिला एक मुलगीही होती. अरिजीतने मुलीसह कोयलला स्वीकारून आयुष्याची नवीन सुरुवात केली. 

अरिजीत सिंगचे पहिले लग्न

अरिजीतने त्याच्या करिअरची सुरुवात 'फेम गुरुकुल' या रिॲलिटी शोमधून केली होती. तिथेच त्याची भेट एका तरुणीशी झाली आणि त्यांनी लग्न केले होते.

Advertisement

वर्ष 2013 मध्ये मोडले पहिले लग्न

पण त्याचे पहिले लग्न फार काळ टिकू शकले नाही आणि वर्ष 2013 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर अरिजीतच्या आयुष्यात एक नवीन वळण आले.

(नक्की वाचा: Annu Kapoor: 'ओम पुरींनी माझ्या बहिणीचे आयुष्य उद्ध्वस्त केले'; अन्नू कपूर यांनी सांगितले सख्ख्या बहिणीचे दुःख)

कोयल रॉय अरिजीतची बालपणीची मैत्रीण

वर्ष 2014मध्ये त्याने आपली बालपणीची मैत्रीण कोयल रॉय हिच्याशी लग्न केले. दोघांनी पश्चिम बंगालमधील एका मंदिरात अतिशय साधेपणाने लग्न केले. या लग्न सोहळ्याला फक्त कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते. कोणताही गाजावाजा न करता त्यांनी नवीन आयुष्याला सुरुवात केली.

कोयल घटस्फोटित होती 

कोयलचाही घटस्फोट झाला होता आणि तिला एक मुलगी होती. पण अरिजीतने तिला आणि तिच्या मुलीला मनापासून स्वीकारले.

अरिजीतचे आनंदी कुटुंब

कोयल आणि अरिजीत आज आपले आनंदी जीवन जगत आहेत. त्यांना दोन मुलं आहेत आणि कोयलची मुलगीही त्यांच्यासोबतच राहते. दोघेही आपले खासगी आयुष्य लाइमलाइटपासून दूर आणि साधेपणाने जगणे पसंत करतात