Aamir khan girlfriend gauri : बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान याचा आज 60 वा वाढदिवस आहे. काल 13 मार्च रोजी दिलेल्या वाढदिवसाच्या पार्टीत त्याने आपल्या नव्या नात्याबाबत घोषणा केली. तो आपली जुनी मैत्रिण गौरी स्प्राट हिला डेट करीत आहेत. मीडियासमोर आपल्या नात्याचा खुलासा केल्यानंतर कोण आहे गौरी स्प्राट, तिचं वय काय, ती कुठे राहते असे अनेक सवाल चाहत्यांकडून विचारले जात आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोण आहे गौरी स्प्राट?
गुरुवारी (13 मार्च) आमिर खानने मुंबईत मीडियासोबत आपला वाढदिवस साजरा केला. त्यांनी मीडियाच्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि आपली गर्लफ्रेंड गौरीची भेट करून दिली. यावेळी आमिर खानने सांगितलं की तो गेल्या 18 महिन्यांपासून गौरीला डेट करीत आहे. मात्र आमिर गौरीला गेल्या 15 वर्षांपासून ओळखतो. गौरी स्प्राट अँग्लो-इंडियन आहे. गौरी बंगळुरूत राहते. ती आमिरच्या प्रॉडक्शन बॅनरअंतर्गत काम करते. तिची आई तमिळ आणि वडील आयरिश आहे. गौरीला एक सहा वर्षांचा मुलगाही आहे. गौरीचे आजोबा एक ब्रिटीश होते. ते भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले होते. इतिहासकार रामचंद्र गुहा यांनीही त्यांच्या लिखाणात गौरीच्या आजोबांचा उल्लेख केल्याचं आमिरने मीडियाशी बोलताना सांगितलं.
नक्की वाचा - Akshay Kumar : सातत्याने फ्लॉप चित्रपटांदरम्यान अक्षयने विकली मुंबईतील तीन घरं
आमिरचा घटस्फोट कधी झाला?
आमिर आणि रीना दत्ताने 1986 मध्ये लग्न केलं आणि 2002 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. तीन वर्षांनंतर आमिरने चित्रपट निर्माती किरण रावसोबत लग्न केलं आणि 2021 मध्ये वेगळे झाले. त्याच वर्षी 2024 मध्ये आमिर गौरीला डेट करण्यास सुरुवात केली आणि 2025 मध्ये आपल्या नात्याबद्दल सार्वजनिकपणे कबुली दिली.
Add image caption here
Photo Credit: PTI
आमिरने गर्लफ्रेंडची ओळख कशी करून दिली?
पत्रकारांनी आमिरला जेव्हा त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल विचारलं त्यावेळी तो म्हणाला, गौरीला सहा वर्षांचा मुलगा आहे. माझी गर्लफ्रेंड कॅटरीना कैफपेक्षाही सुंदर आहे. जेव्हा मी तिच्यासोबत असतो मला खूप सहज अगदी घरासारखं वाटतं. माझी दोन्ही मुलं जुनैद आणि इरा तिला भेटले आहेत. आमिरला लग्नाबद्दल विचारलं. त्यावेळी तो म्हणाला, वयाच्या साठाव्या वर्षी लग्नाचा विचार अद्याप तरी केलेला नाही. मात्र आम्ही एकमेकांना वचवबद्ध आहोत.