Rekha Mansion Basera: संजय लीला भन्सालींच्या सेटसारखा भव्यदिव्य आहे रेखा यांचा बंगला, 'बसेरा'ची झलक पाहून म्हणाल शाही महल

Rekha Mansion Basera: बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा त्यांच्या क्लासिक लुकसाठी ओळखल्या जातात. मुंबईतील बँडस्टँड परिसरातील शानदार घरामध्ये त्या राहतात. मुंबईतील सर्वात सुंदर आणि आलिशान परिसरामध्ये त्यांचे घर आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Rekha Mansion Basera: कोट्यवधी रुपयांच्या बंगल्यामध्ये राहतात रेखा

Bollywood Actress Rekha Mansion Basera: बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा त्यांच्या क्लासिक आणि हटके लुकमुळे आजही चर्चेत असतात. मुंबईतील बँडस्टँड परिसरामध्ये त्यांचा आलिशान 'बसेरा' नावाचा बंगला आहे. 'बसेरा'ची झलक पाहण्यासाठी दूरदूरहून लोक मुंबईमध्ये येतात. 150 कोटी रुपये किंमतीचा रेखा यांचा हा बंगला मुंबईतील सर्वात आलिशान मालमत्तांपैकी एक आहे. घराचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्याभोवती पसरलेली हिरवळ. सुंदर पद्धतीने डिझाइन केलेल्या या बंगल्यामध्ये हिरवळ मोठ्या प्रमाणात आहे, जी सर्वांचे लक्ष वेधून घेते.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

बंगल्याच्या काही भिंती पांढऱ्या रंगाच्या आहेत आणि विशेष पद्धतीने डिझाइन केलेल्या खिडक्यांमुळे घराच्या आतील भागामध्ये नैसर्गिक प्रकाश सहजरित्या पोहोचतो. रेखा यांच्या घराचा बाहेरील शाही भाग पाहिल्यानंतर बंगला आतील बाजूनंही किती आलिशान असेल याची कल्पना येते.  भानुरेखा गणेशन, ज्यांना संपूर्ण जग रेखा या नावाने ओळखते. कोट्यवधी किंमतीच्या या राजवाड्यात राहणाऱ्या रेखा यांचे व्यक्तिमत्त्व देखील एखाद्या महाराणीप्रमाणेच भासते. त्यांचे घर देखील त्यांच्या इतकेच सुंदर आहे.  

(नक्की वाचा: Actor Mahesh Babu : सुपरस्टार महेश बाबूला ईडीचं समन्स, 27 एप्रिलला हजर राहण्याचे आदेश)

रिपोर्ट्सनुसार, रेखा यांच्या घराच्या भिंती मातकट रंगाचे पॅटर्न असणाऱ्या वॉलपेपरने सजवल्या गेल्या आहेत. एकूणच रेखा यांचा बंगला बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्या चित्रपटातील भव्यदिव्य सेटप्रमाणेच आहे. घराचा प्रत्येक कोपरा रेखा यांचे सौंदर्य, परंपरा आणि नम्रतेचे प्रतिबिंबित दर्शवतो.  

Advertisement

(नक्की वाचा: Rinku Rajguru: रिंकू राजगुरुच्या आयुष्यातील 'पर्मनंट'व्यक्ती कोण? डिनर डेट,फोटो आणि चर्चांना उधाण)