जाहिरात

Rinku Rajguru: रिंकू राजगुरुच्या आयुष्यातील 'पर्मनंट'व्यक्ती कोण? डिनर डेट,फोटो आणि चर्चांना उधाण

तिने जे फोटो शेअर केले आहेत त्यात तिने या डिनर डेटमध्ये असलेल्या मेन्यूचा ही फोटो शेअर केला आहे.

Rinku Rajguru: रिंकू राजगुरुच्या आयुष्यातील 'पर्मनंट'व्यक्ती कोण? डिनर डेट,फोटो आणि चर्चांना उधाण
मुंबई:

सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू आपल्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह असते. तिने केलेल्या पोस्टही चर्चेत असतात. काही महिन्यापूर्वी तिचा आणि कृष्णराज महाडीक यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यावेळी रिंकू कोल्हापूरची सुन होणार अशी जोरदार चर्चा सोशल मीडियावर होती. त्यानंतर या दोघांनाही यावर स्पष्टीकरण देताना नाकीनऊ आले होते. त्यानंतर आता परत रिंकूचा आणखी एक फोटो चर्चेचा विषय ठरला आहे. त्यात तिने आपल्या 'पर्मनंट' सोबत असल्याचं सांगत इन्स्टा स्टेटसवर फोटो शेअर केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रिंकूने आपल्या पर्मनंट बरोबर डिनर डेट केल्याचं ही सांगितलं आहे. त्यामुळे हा पर्मनंट व्यक्ती कोण? याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली होती. अनेकांनी त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न ही केला. तिच्या स्टेटसवर तिच्या चाहत्यांना कमेंटचा पाऊस पाडला आहे. काही सुचनाही केल्या आहेत. तर अनेकांनी लाईक ही केलं आहे. काहींनी कमेंट करताना सैराटमधील तिचा सहकारी आकाश ठोसर याचं ही नाव घेतलं आहे. पण खरा ट्वीस्ट पुढे होता. 

ट्रेंडिंग बातमी - Rajeshwari Kharat: 'फॅन्ड्री' फेम शालूने धर्म बदलला? सोशल मीडियावरुन दिली माहिती, पाहा PHOTO

रिंकूनं नुकतीच डिनर डेट केली. त्याबाबत काही फोटो तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले. त्यामुळे तिच्या आयुष्यात कोण खास व्यक्ती आहे याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर झाली. शिवाय रिंकूने हे फोटो शेअर करताना त्याल कॅप्शन ही तसेच दिले होते. त्यामुळे अनेकींची उत्सुकताही वाढली होती. 'माझ्या 'पर्मनंट'सोबत डिनर डेट' असं कॅप्शन तिने दिलं होतं. शिवाय त्या डिनर डेटचा खास फोटोही शेअर केला होता. 

Latest and Breaking News on NDTV

ट्रेंडिंग बातमी - Harsha Bhogle : हर्षा भोगलेवर बंदी घाला! 'या' असोसिएशननं BCCI ला लिहिलं थेट पत्र, कारण काय?

तिने जे फोटो शेअर केले आहेत त्यात तिने या डिनर डेटमध्ये असलेल्या मेन्यूचा ही फोटो शेअर केला आहे. त्यात जेवणाचं ताट, उकडीचे मोदक दिसत आहेत. त्या बरोबर तिने स्वत:चा ही फोटो शेअर केला आहे. त्यानंतर मात्र  रिंकूने ती खास व्यक्ती कोण याचा ही खुलासा करत आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. ती पर्मनंट व्यक्ती कोण हे रिंकूने सांगितल्यानंतर तिचं कौतूक ही झालं आहे, शिवाय त्या पोस्टवर कमेंटचा धो धो पाऊस ही पडला आहे. 

ट्रेंडिंग बातमी : अश्विनी बिद्रे हत्याकांडात मोठी अपडेट, आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप; 9 वर्ष जुन्या प्रकरणात अखेर न्याय

रिंकू ज्या व्यक्ती बरोबर डिनर डेटला गेली होती ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून तिची आई आहे. 'माझी पर्मनंट.. आई आणि मी' असं कॅप्शन तिने त्या फोटोला दिलं आहे. त्यानंतर तिने तो फोटो शेअर केला आहे. तिच्या या कृतीचे नेटकऱ्यांनी कौतूक ही केलं आहे. रिंकूने सैराट चित्रपटात प्रभावी काम केलं होतं. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहीलं नाही. मराठी बरोबर हिंदी चित्रपट सृष्टीतही रिंकूने आपला जम बसवला आहे.