- बॉर्डर चित्रपटाचा सीक्वल बॉर्डर 2 २७ वर्षांनंतर २३ जानेवारी २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे
- अनुराग सिंग दिग्दर्शित बॉर्डर 2 मध्ये सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी प्रमुख भूमिकेत आहेत
- १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित या चित्रपटाने देशभक्तीची लाट प्रेक्षकांमध्ये पुन्हा निर्माण केली आहे
1997 मध्ये आलेल्या 'बॉर्डर' या ऐतिहासिक चित्रपटाचा सीक्वल तब्बल 27 वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 23 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या 'बॉर्डर 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश संपादन केले आहे. अनुराग सिंग यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात सनी देओलसह वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये पुन्हा एकदा देशभक्तीची लाट निर्माण केली आहे.
या चित्रपटाची अधिकृत घोषणा 13 जून 2024 रोजी झाली होती. पहिल्या चित्रपटाच्या २७ व्या वर्धापनदिनी हा योग जुळवून आणण्यात आला होता. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी भारतीय लष्कराची मदत घेण्यात आली आहे. झाशी, बबिना कॅन्टोन्मेंट, खडकवासला येथील एनडीए (NDA) आणि आयएनएस (INS) विक्रांत सारख्या खऱ्या लष्करी तळांचा वापर यात करण्यात आला आहे.
तांत्रिकदृष्ट्या हा चित्रपट अधिक वास्तववादी वाटावा, यासाठी पंजाब, उत्तराखंड आणि राजस्थानच्या दुर्गम भागात चित्रीकरण करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या कमाईचा आलेख चढताच राहीला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी 30 कोटींची कमाई करत आश्वासक सुरुवात केली होती. 26 जानेवारीच्या सुट्टीचा चित्रपटाला मोठा फायदा झाला असून, चार दिवसांत या चित्रपटाने 188.51 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहे. बॉर्डर चित्रपटासोबत ही याची तुलना केली जात आहे. सनी देओलसह वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांचे काम सर्वांच्याच पसंतीला उतरत आहे.