बॉलिवूडचा अभिनेता सनी देओल याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'बॉर्डर 2' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित करण्यास सुरुवात केली आहे. प्रजासत्ताक दिनापूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत 121 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. प्रजासत्ताक दिनी (Republic Day 2026) अनेक चित्रपटगृहात या चित्रपटाचे शो हाऊसफुल झाल्याचे दिसत होते. 23 जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात सनी देओलसह वरुण धवन, अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांझ यांच्या मुख्य भूमिका आहेत.
नक्की वाचा: वृद्धाचे अश्लील चाळे, कमरेवर हात, गुलाब फेकले.. बॉलिवूड अभिनेत्रीसोबत गैरवर्तन, पोस्ट व्हायरल
तीन दिवसांत बॉर्डर-2 ने किती कमाई केली ?
चित्रपट निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बॉर्डर 2' ने पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे खेचून आणण्यात यश मिळवले आहे. 23 तारखेपासून 26 जानेवारीपर्यंत या चित्रपटाने दर दिवशी किती कोटींची कमाई केली आहे त्याची दिवसनिहाय आकडेवारी Sacnilk च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- पहिला दिवस: 30 कोटी रुपये
- दुसरा दिवस: 36.05 कोटी रुपये
- तिसरा दिवस: 54.5 कोटी रुपये
- एकूण कमाई: 121 कोटी रुपये
1997 च्या बॉर्डरचा सिक्वेल
हा चित्रपट 1997 साली प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'बॉर्डर'चा सिक्वेल आहे. भारतीय सैनिकांची एक छोटी बटालियन ही आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज पाकिस्तानी सैन्याशी भिडते आणि त्यांचा पाडाव करते असे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. चित्रपटातील ॲक्शन सीन आणि धमाकेदार डायलॉग यामुळे हा चित्रपट हिट होईल अशी अपेक्षा समीक्षक वर्तवत होते. अनुराग सिंह यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून टी-सीरीज आणि जेपी फिल्म्सने याची निर्मिती केली आहे.
नक्की वाचा: प्रसिद्ध मराठमोठ्या रिलस्टारचा मृत्यू! मीडिया जगतात खळबळ; मायलेकाच्या व्हिडिओंनी लावलेलं वेड
तगडी स्टारकास्ट
'बॉर्डर २' मध्ये केवळ सनी देओलच नाही, तर वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. तसेच मोना सिंह, सोनम बाजवा, अन्या सिंह आणि मेधा राणा यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. भूषण कुमार, कृष्ण कुमार, जेपी दत्ता आणि निधी दत्ता या चित्रपटाचे निर्माते आहेत. सरलेल्या आठवड्यात आलेल्या सलग सुट्ट्यांचा आणि खासकरून प्रजासत्ताक दिनाचा या चित्रपटाला फायदा होईल असा अंदाज होता, आणि तो खरा ठरताना दिसतो आहे. येत्या काही दिवसांत हा चित्रपट आणखी नवे विक्रम प्रस्थापित करेल, असा अंदाज आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world