Celebrity Fitness: अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिला पाहून ती 50 वर्षांची झाली आहे, असे कुणीही म्हणणार नाही. स्वतःला फिट ठेवण्यासाठी ती केवळ योगा आणि व्यायामच करत नाही, तर आपल्या खाण्यापिण्याचीही विशेष काळजी घेते. सोहा अली खानच्या पोडकास्टमध्ये बोलताना मलायकाने तिच्या आहाराबद्दल सांगितले. ती काय खाऊन-पिऊन स्वतःला फिट ठेवते, हे तिने स्पष्ट केले आहे.
मलायका अरोराच्या फिटनेसचे रहस्य | Malaika Arora's Fitness Secret
मलायका अरोरा तीन मूलभूत नियमांचे पालन करते. झोप, पोषण आणि माइंड-बॉडी कनेक्शन. या तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करून ती स्वतःला इतके फिट ठेवते. मलायका म्हणते, "मी 50 वर्षांची असू शकते, पण मला तसे वाटत नाही. माझ्यासाठी हे फक्त एक वय आहे, जी माझी ओळख नाही." खाण्यापिण्याबद्दल बोलायचे झाल्यास, मलायकाला साधे जेवण आवडते आणि ती तिच्या चाहत्यांनाही साधे, घरगुती जेवण खाण्याचा सल्ला देते.
ती तिच्या आहारात तुपाचा (Ghee) समावेश करते. मलायकासाठी तूप हे एक सुपरफूड आहे. याव्यतिरिक्त, ती भरपूर पाणी पिते, पुरेशी झोप घेते आणि शिस्तबद्ध राहण्याचा प्रयत्न करते. कारण, तिचे असे मत आहे की सातत्य (consistency) ठेवूनच आयुष्यात बदल घडवता येतात. वर्कआउटनंतर सप्लिमेंट्स घेण्याऐवजी मलायका घरी बनवलेला टोस्ट, अंडी आणि डोसा खाते. याशिवाय, तिला प्रोटीन शेक (Protein Shake) आवडतो, पण तोसुद्धा ती घरीच केळी, खजूर आणि सुक्या मेव्यापासून तयार करते.
मलायका पोर्शन कंट्रोलवर (Portion Control) लक्ष केंद्रित करते. म्हणजेच एकावेळी खूप जास्त खाणे टाळते. ती सांगते की ती स्वतःला उपाशी ठेवत नाही आणि फिट राहण्यासाठी कुणीही उपाशी राहू नये, असा तिचा सल्ला आहे. ती प्रत्येक गोष्टीत समतोल राखते, असेही मलायका सांगते. मलायका या वयात ही इतकी फिट कशी दिसते याचा राज तीनं या पोडकास्टच्या माध्यमातून सांगितलं आहे.