Celina Jaitly Divorce Case : 'नो एन्ट्री' आणि 'गोलमाल रिटर्न्स' सारख्या सिनेमांमधून तुफान लोकप्रिय झालेली अभिनेत्री सेलिना जेटली (Celina Jaitly) हिने तिचा ऑस्ट्रियन हॉटेल व्यावसायिक पती पीटर हॉग याच्याविरुद्ध कोर्टात धाव घेतली आहे. या दोघांच्या 13 वर्षांच्या नात्यात मोठा तणाव निर्माण झाला असून, सेलिनाने पीटरवर घरगुती हिंसाचार (Domestic Violence) आणि क्रूरता केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
सेलिनाने मुंबईतील कोर्टात 21 नोव्हेंबरला याचिका दाखल केली असून, पती पीटर हॉगकडून 50 कोटी रुपये इतकी मोठी नुकसानभरपाई (compensation) मागितली आहे. पीटरमुळे माझे झालेले 'आर्थिक नुकसान' आणि 'उत्पन्न गमावल्याचे' कारण देत तिने ही मागणी केली आहे. या याचिकेच्या आधारावर कोर्टाने पीटरला नोटीस बजावली आहे.
काय आहेत आरोप?
47 वर्षांची सेलिना जेटली हिने तिच्या याचिकेत पीटर हॉग (वय 48) याचे वर्णन, तो एक 'नार्सेसिस्ट' (Narcissist) आणि 'आत्ममग्न व्यक्ती' (Self-absorbed Individual) आहे. तो माझ्याबद्दल किंवा आमच्या तीन मुलांबद्दल 'काहीही सहानुभूती' (no empathy) ठेवत नाही, असे तिने सांगितले आहे.
( नक्की वाचा : Palash Muchhal : 'स्मृतीपेक्षाही दोघांची जास्त जवळीक', पलाश ढसढसा रडला, आईनं सांगितलं 'त्या' दिवशी काय घडलं? )
सेलिनाने आरोप केला आहे की, पीटरकडून मला भावनिक (Emotional), शारीरिक (Physical), लैंगिक (Sexual) आणि तोंडी (Verbal) अशा अनेक प्रकारच्या अत्याचाराला सामोरे जावे लागले. या अत्याचारांमुळेच मला ऑस्ट्रियातील आमचं घर सोडून नाईलाजाने भारतात परतावे लागले, असं तिने याचिकेत स्पष्ट केले आहे.
आर्थिक स्वातंत्र्य हिरावल्याचा दावा
सेलिनाने सांगितले की, आम्हाला मुले झाल्यानंतर पीटरने वेगवेगळी कारणं देत मला काम करण्यापासून 'मनाई' (prohibited) केली. त्याने माझे आर्थिक स्वातंत्र्य (financial independence) आणि माझा सन्मान (dignity) हिरावून घेतला. तो फक्त त्याच्या 'परवानगीने' मी छोटे प्रोजेक्ट्स करू शकत होते, असेही तिने म्हटले आहे. याचिकेत सेलिनाने पीटरवर तिची मुंबईतील मालमत्ता फसवून त्याच्या नावावर करून घेतल्याचाही आरोप केला आहे.
( नक्की वाचा : Dharmendra : 'यमला पगला दिवाना' माझा चित्रपट होता, धर्मेंद्र यांचा फोन आला आणि...सचिन पिळगावकरांचा मोठा खुलासा )
मुलांची कस्टडी आणि पोटगीची मागणी
सेलिना जेटली आणि ऑस्ट्रियन व्यावसायिक पीटर हॉग यांचे 2010 मध्ये लग्न झाले होते. त्यांना विन्स्टन (Winston), विराज (Viraaj) आणि आर्थर (Arthur) अशी तीन मुले आहेत, जी सध्या पीटरच्या ताब्यात ऑस्ट्रियामध्ये आहेत.
सेलिनाने कोर्टाला विनंती केली आहे की, पीटरला तिच्या मुंबईतील घरात येण्यास मनाई करावी आणि मुलांची कस्टडी तिला द्यावी. तसेच, तिने कोर्टाकडे दर महिन्याला 10 लाख रुपये पोटगी (maintenance) देण्याची देखील मागणी केली आहे. विशेष म्हणजे, पीटर हॉगनेही यावर्षी ऑगस्टमध्ये ऑस्ट्रियातील कोर्टात घटस्फोटाची (Divorce) याचिका दाखल केल्याचे सेलिनाच्या याचिकेत स्पष्ट केले आहे.