क्रिकेटर स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि संगीतकार पलाश मुच्छल (Palash Muchhal) यांच्या लग्नाभोवतीची आरोग्यविषयक चिंता अजूनही कमी झालेली नाही. स्मृतीच्या वडिलांना लग्नाच्या दिवशी हृदयविकाराचा झटका आल्यासारखी लक्षणे दिसल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले होते. त्यापाोपाठ, नवरदेव पलाशलाही अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत आहे.
सांगलीहून मुंबईला हलवले
पलाशला सोमवारी ( 24 नोव्हेंबबर) व्हायरल इन्फेक्शन आणि अॅसिडिटी वाढल्यामुळे थोड्या वेळासाठी सांगलीतील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. परंतु, आता NDTV सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पलाशला पुढील उपचारांसाठी मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. त्याला गोरेगाव, मुंबई (Goregaon, Mumbai) येथील एसव्हीआर हॉस्पिटलमध्ये (SVR Hospital) दाखल करण्यात आले.
NDTV सूत्रांनी सांगितल्यानुसार, पलाशला सतत कन्सर्ट्स (Concerts) आणि लग्नानिमित्तचा प्रवास करावा लागल्यामुळे तो अत्यंत तणावाखाली (Extremely Stressed) होता. याच गोष्टीचा परिणाम त्याच्या आरोग्यावर झाला आहे. पलाशला नेमका कोणता गंभीर आरोग्य त्रास होत आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
वडिलांची तब्येत बिघडल्याने मोठा धक्का
हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, स्मृती यांच्या वडिलांची तब्येत बिघडल्यानंतर लग्नाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय पलाशनेच घेतला. पलाशची आई अमिता मुच्छल यांनी या वृत्तपत्राला सांगितले की, पलाशचे स्मृतीचे वडील श्रीनिवास मंधाना (Shrinivas Mandhana) यांच्यावर खूप प्रेम आहे. त्यांच्या आजारपणाची बातमी ऐकून पलाशला मोठा धक्का बसला आणि त्याने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
( नक्की वाचा : कोण आहे स्मृती मानधनाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल? दोघांमध्ये किती आहे वयाचं अंतर, कुणाची कमाई जास्त? )
त्यांनी सांगितले, "पलाशचे अंकलवर खूप जास्त प्रेम आहे... स्मृतीपेक्षाही ते दोघे (पलाश आणि श्रीनिवास मानधना) जवळ आहेत. जेव्हा त्यांना त्रास झाला, तेव्हा स्मृतीच्या आधी पलाशनेच निर्णय घेतला की, जोपर्यंत अंकल ठीक होत नाहीत, तोपर्यंत लग्न करायचे नाही."
पलाश ढसढसा रडला
आई अमिता यांनी पुढे सांगितले की, श्रीनिवास मांधना यांच्या हृदयविकाराच्या बातमीमुळे पलाशवर खूप परिणाम झाला आणि त्याला अश्रू अनावर झाले. "हळद झाल्यामुळे आम्ही त्याला बाहेर जाऊ दिले नाही. तो इतका रडला की, अचानक त्याची तब्येत बिघडली. त्यामुळे त्याला 4 तास हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागले. त्याला IV ड्रिप (IV Drip) देण्यात आली, ECG काढला आणि इतर चाचण्या करण्यात आल्या. सर्व चाचण्यांचे अहवाल नॉर्मल आले, पण तो खूप तणावाखाली (Under Stress) आहे," असे पलाशच्या आईने सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world