दुसऱ्या लग्नासाठी धर्म बदलला, तलाक होताच हिंदू धर्मात परतली अभिनेत्री

2006 साली या अभिनेत्रीचे पहिले लग्न झाले होते. हे लग्न काही वर्ष टिकले ज्यानंतर तिने घटस्फोट घेतला होता. या अभिनेत्रीने दुसरे लग्न केले आणि 2018 साली या अभिनेत्रीचा पुन्हा घटस्फोट झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

आतापर्यंत दोन लग्न केलेल्या आणि नंतर घटस्फोट घेतलेल्या हिंदी अभिनेत्रीने तिच्या आयुष्यात घडलेल्या घटनांबद्दल  मोकळेपणाने बोलण्यास सुरुवात केली. 2006 साली या अभिनेत्रीचे पहिले लग्न झाले होते. हे लग्न काही वर्ष टिकले ज्यानंतर तिने घटस्फोट घेतला होता. या अभिनेत्रीने दुसरे लग्न केले आणि 2018 साली या अभिनेत्रीचा पुन्हा घटस्फोट झाला. दुसऱ्या लग्नासाठी या अभिनेत्रीने इस्लाम धर्म स्वीकारला होता. या अभिनेत्रीने एका मुलाखतीमध्ये सांगितलंय की तिला लग्नापूर्वी इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगण्यात आले होते. यासाठी आपले ब्रेनवॉश करण्यात आल्याचं या अभिनेत्रीचे म्हणणे आहे. पुन्हा हिंदू धर्मात आल्यानंतर मी खूश आहे असं या अभिनेत्रीने म्हटलं आहे. 

नक्की वाचा : घटस्फोटाच्या चर्चेमध्ये या अभिनेत्रीशी जोडलं जातंय अभिषेकचं नाव, लग्नाच्या प्लॅनवर तिनं दिलं उत्तर!

चाहत खन्ना असं या अभिनेत्रीचे नाव आहे. तिने एका खासगी मनोरंजनविषयक वाहिनीला मुलाखत देताना म्हटले की, मी धार्मिक नाहीये मात्र मी आध्यात्मिक आहे. मी मोकळ्या स्वभावाची असून मी सगळ्या धर्मांचा आदर करते. मी कट्टरपंथी नाहीये असंही तिने म्हटलं. दुसरे लग्न झाल्यानंतर मला इस्लामबद्दल कळाले, मी येशू ख्रिस्तालाही मानते आणि कालीमातेची तसेच कृष्णाचीही भक्त आहे असंही तिने सांगितलं. 

नक्की वाचा : गोविंदाला या अभिनेत्रीने लावलं होतं याड, साखरपुडा मोडून थाटायचा होता संसार;मग काय झालं?

चाहतने या मुलाखतीमध्ये म्हटलं की तलाक घेतल्यानंतर पुन्हा सनातन धर्मात परतल्यावर मला फार बरं वाटतंय. इस्लाम धर्माप्रती श्रद्धा निर्माण होण्यासाठी मला 4-5 वर्ष लागली. मी आजही इस्लाम धर्मातील काही गोष्टी मानते. मात्र मी सनातन धर्मात परतल्याचा मला आनंद आहे. मला अनेक गोष्टींमागच्या खऱ्या बाबी कळण्यास मदत झाली असे चाहत खन्नाने म्हटले आहे. चाहतने म्हटलं की दुसरे लग्न झाल्यानंतर मला सांगण्यात आलं की देवांची पूजा करू नकोस. ही गोष्ट मला अजिबात आवडली नव्हती. यावर चाहतला विचारण्यात आलं की तिचं ब्रेनवॉश करण्यात आलं होतं का ? यावर तिने म्हटलं की मला माहिती नव्हतं की नक्की काय झालं मात्र तुम्ही म्हणू शकता की तसंच काहीतरी झालं होतं.     
 

Topics mentioned in this article