अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय (Abhishek Bachchan And Aishwarya Rai) या बॉलिवूडमधील स्टार कपलबाबत गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या अफवा चर्चेत आहेत. सध्या एक नव्या अफवेनं जोर पकडला आहे. अभिषेक बच्चनचं नाव फिल्म इंडस्ट्रीमधील एका अभिनेत्रीशी जोडलं जात आहे. त्यामुळे त्याला चांगलंच ट्रोल केलं जातंय. या अफवांनुसार अभिषेक बच्चन त्याची 'दसवीं' या चित्रपटाची सहकलाकार निम्रत कौर (Nimrat Kaur) सोबत डेट करत आहे. या विषयावर दोघांनीही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोण आहे निम्रत कौर?
42 वर्षांच्या निम्रत कौरनं 2005 साली चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. 'यहां' हा तिचा पहिला चित्रपट होता. इरफान खानसोबतच्या 'लंचबॉक्स' या सिनेमामुळे तिला खरी ओळख मिळाली. निम्रत कौर मोजक्याच चित्रपटांमध्ये काम करते. तिच्या अभिनयाची नेहमीच प्रशंसा केली जाते. 'एअरलिफ्ट', 'दसवीं' आणि 'सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' या चित्रपटांमध्येही तिनं काम केलं आहे.
( नक्की वाचा : अभिषेक-ऐश्वर्यामुळे चर्चेत आलेला Grey Divorce प्रकार काय आहे? तो का घेतला जातो? )
लग्नावर काय सांगितलं?
अभिषेक बच्चन आणि निम्रत कौर हे दसवीं चित्रपटाच्या दरम्यान जवळ आले, असं मानलं जात आहे. अभिषेक आणि निम्रतच्या रिलेशनबाबतची अफवा सुरु असतानाच निम्रत कौरचा एक जुना व्हिडिओ समोर आला आहे. निम्रत त्या व्हिडिओमध्ये लग्नाबाबत बोलत आहे.
लग्न हा नशिबाचा भाग आहे. तुम्हाला योग्य व्यक्ती मिळण्यावर ते अवलंबून आहे. ही गोष्ट आगोदरच निश्चित करता येते असं मला वाटत नाही, असं निम्रतनं सांगितलं. निम्रतचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यावर लोकं वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world