तोचतोचपणा, पांचट विनोद, दर्जाहीन कंटेट, रटाळ अभिनय यामुळे एकेकाळी जोमात चालणाऱ्या 'चला हवा येऊ द्या' च्या प्रसिद्धीला उतरती कळा लागली होती. एक काळ असा होता जेव्हा चला हवा येऊ द्या हा शो , महाराष्ट्राची हास्य जत्रापेक्षा पाहीला जात होता. मात्र कालांतराने महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये वेगळे विषय हाताळले गेले. चुरचुरीत विनोद आणि उत्तम अभिनय यांच्यामुळे काही दिवसांतच या 'शो' ने 'चला हवा येऊ द्या'ची हवा काढली. सोशल मीडियावर या शोवरून टीका करत असताना निलेश साबळे हा टीकेचे लक्ष्य असायचा. अनेकांना ज्युरी म्हणून बसवण्यात आलेला स्वप्नील जोशी अजिबात आवडला नव्हता. या शोचा पहिला सीझन 10 वर्ष चालला होता. आता याचा दुसरा सीझन येत असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश साबळेकडून काढून घेण्यात आले आहे. त्याच्याऐवजी अभिनेता अभिजीत खांडकेकर हा या शोचे सूत्रसंचालन करणार आहे.
( नक्की वाचा: शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंत घाबरली, कारण काय? )
अभिनयासोबतच विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, पुरस्कार सोहळ्यांमध्ये होस्ट म्हणून अभिजीत खांडकेकर दिसला होता. अभिनयासोबतच त्याने सूत्रसंचालनामध्येही आपला जम बसवला होता. कदाचित यामुळेच त्याच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली असावी. सूत्रीसंचालनासोबत निलेश साबळे याच्याकडून या शोचं दिग्दर्शनही काढून घेण्यात आलं आहे. त्याच्या जागी दिग्दर्शनाची जबाबदारी प्रियदर्शनजाधव, अमोल पाटील आणि योगेश शिरसाट सांभाळतील असे सांगितले जात आहे.
( नक्की वाचा: सिरीयलमध्ये अभिनेत्री गोळीबारात जखमी, 'मंजू'साठी आजोबा गुपचूप साताऱ्यात पोचले )
या शोच्या दुसऱ्या सीझनमध्ये श्रेया बुगडे, कुशल बद्रीके, भरत गणेशपुरे यांच्यासोबतीला गौरम मोरे हा देखील दिसणार आहे. भाऊ कदम मात्र नव्या सीझनमध्ये नसेल असे सांगितले जात आहे कारण दुसऱ्या सीझनच्या ट्रेलरमध्ये तो दिसला नव्हता. या शोमध्ये आणखीही काही नवे कलाकार दिसतील असे सांगितले जात आहे. ते कोण आहेत, याची उत्सुकता निर्माण होऊ लागली आहे.