जाहिरात

Chhaava Movie Box Office Collection: 'छावा'ची बॉक्स ऑफिसवर गर्जना! पहिल्याच दिवशी पैशांचा पाऊस; कमाईचा आकडा किती?

चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळत असून छावाने पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई केली आहे. पहिल्या दिवशीच्या कलेक्शनवरुन छावा हा 2025 मधील सर्वात यशस्वी चित्रपट ठरु शकतो. 

Chhaava Movie Box Office Collection: 'छावा'ची बॉक्स ऑफिसवर गर्जना! पहिल्याच दिवशी पैशांचा पाऊस; कमाईचा आकडा किती?

Chhaava Movie Collection: छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा बहुचर्चित छावा चित्रपट काल प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळत असून छावाने पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई केली आहे. पहिल्या दिवशीच्या कलेक्शनवरुन छावा हा 2025 मधील सर्वात यशस्वी चित्रपट ठरु शकतो. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा चित्रपटाचा सध्या बॉक्स ऑफिसवर बोलबाला पाहायला मिळत आहे. अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदाना यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. विकी कौशलने यामध्ये संभाजीराजेंची भूमिका अक्षरशः जिवंत केली आहे. त्यामुळेच चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच अनेक शो हाऊसफुल्ल झाले होते.  या चित्रपटाने पहिल्याच दिवशी उत्तम कलेक्शन केले आणि या वर्षी प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांना मागे टाकत अव्वल स्थानावर पोहोचला.

सॅकॅनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'छावा' ने पहिल्याच दिवशी 31 कोटी रुपयांची जबरदस्त कमाई केली आहे. हे सर्व आकडे सुरुवातीचे आहेत मा त्रयावरुन स्पष्ट आहे की या चित्रपटाने या वर्षी प्रदर्शित झालेल्या सर्व बॉलिवूड आणि साऊथच्या चित्रपटांना मागे टाकले आहे. 2025 मध्ये आतापर्यंत अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, परंतु त्यापैकी कोणत्याही चित्रपटाची सुरुवात इतकी चांगली झाली नाही. 'छावा' चित्रपटाला प्रेक्षकांकडून तसेच चित्रपट समीक्षकांकडून खूप कौतुक मिळत आहे.

(नक्की वाचा- Amravati News: 'भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही पण..', कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना हिणवलं)

'छावा' हा चित्रपट 130 कोटी रुपयांमध्ये बनवण्यात आला आहे. त्या अर्थाने, 'छवा' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी ३१31कोटींपेक्षा जास्त कमाई केल्याने, हिंदी चित्रपटसृष्टीत विकी कौशलचेही वजन वाढले आहे.  या वर्षी आतापर्यंत कोणत्याही हिंदी चित्रपटाची सर्वात मोठी ओपनिंग मिळवली आहे.

याआधी अक्षय कुमार आणि वीर पहाडिया यांच्या 'स्काय फोर्स' या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी सुमारे 15.30 कोटी रुपयांची कमाई केली होती. आतापर्यंत हिंदीमध्ये बनलेल्या सर्व ऐतिहासिक चित्रपटांपैकी ही सर्वात मोठी ओपनिंग आहे. याआधी हा विक्रम दीपिका पदुकोण, रणवीर सिंग स्टारर 'पद्मावत' या चित्रपटाच्या नावावर होता ज्याची ओपनिंग 24 कोटी रुपये होती.