Chhaava Video: 'छावा' पाहताना चवताळला, तरुणाने असं केलं की थेट जेलमध्ये गेला... पाहा VIDEO

Chhaava Movie Viral Video: सिनेमागृहांमध्ये शिवगर्जना, हरहर महादेवच्या घोषणा पाहायला मिळत आहे. दुसरीकडे आपल्या लाडक्या राजांचे अत्याचार पाहताना अनेकांना अश्रुही अनावर होत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Chhaava Movie: स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजे यांच्या आयुष्यावरील छावा चित्रपट सध्या सिनेमागृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या भूमिकांचे कौतुक होत असून शिवप्रेमींचा या चित्रपटाला जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर सिनेमागृहांमधील अनेक व्हिडिओही व्हायरल होत आहेत, ज्यामधील एका व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

छत्रपती संभाजीराजेंच्या छावा चित्रपटाला प्रचंड मोठा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. सिनेमागृहांमध्ये हा चित्रपट पाहताना अभुतपूर्व असा प्रतिसाद पाहायला मिळत असून राजेंचा पराक्रम पाहताना लहानांपासून तरुणांपर्यंत सर्वांचीच छाती अभिमानाने फुगत आहे. सिनेमागृहांमध्ये शिवगर्जना, हरहर महादेवच्या घोषणा पाहायला मिळत आहे. दुसरीकडे आपल्या लाडक्या राजांचे अत्याचार पाहताना अनेकांना अश्रुही अनावर होत आहेत.

अशातच गुजरातमध्ये छावा चित्रपटाचा शो असताना एक धक्कादायक प्रकार घडला आहे.  छावा चित्रपट सुरु असताना एका प्रेक्षकाने थिएटरच्या स्किनचा पडदा फाडल्याची घटना गुजरातच्या भरुच येथे घडली. रविवारी रात्री 11. 45 वाजता शोदरम्यान हा प्रकार घडला. चित्रपटातील क्लायमेक्स सुरु होताच  प्रेक्षकाने हे कृत्य केले. या सीनमध्ये संभाजी राजेंवर अत्याचार सुरु असल्याचे दाखवले जात होते.

ट्रेंडिंग बातमी - DRDO चे माजी संचालक हनीट्रॅप प्रकरण; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती उघड

औरंगजेब संभाजी महाराजांना कैद करतो आणि महाराजांचा छळ करतो. आपल्या लाडक्या राजेंचे हे हाल न बघवल्याने एक तरुण चवताळून उठला आणि थिएटरमधील पडदा फाडला आणि त्याचे नुकसान केले. हा घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  जयेश वासोवा असे या तरुणाचे नाव आहे.

Advertisement

दरम्यान, थिएटरचे नुकसान केल्याची माहिती समजताच पोलिसांनी तात्काळ सिनेमागृहात धाव घेतली आणि संबंधित तरुणाला ताब्यात घेतले आहे. या प्रकारानंतर सिनेमागृहातील इतर प्रेक्षकांना दुसऱ्या स्क्रिनवर चित्रपट दाखवला गेला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तरुणाच्या त्या कृतीचे समर्थन दिले असून भावनेच्या भरात हे कृत्य केल्याचे म्हटले आहे.