जाहिरात

DRDO चे माजी संचालक हनीट्रॅप प्रकरण; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती उघड

झारा नावाच्या एका महिलेने कुरुलकर यांना हनीट्रॅपमध्ये फसवून त्यांच्याकडून गोपनीय माहिती मिळवली, असा एटीएसचा दावा आहे.

DRDO चे माजी संचालक हनीट्रॅप प्रकरण; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती उघड

राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी

Honeytrap Case : डीआरडीओचे माजी संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर (Former Director of DRDO Dr. Pradeep Kurulkar) प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. कुरुलकर यांनी पाकिस्तानी हेरांना गोपनीय माहिती पुरवल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. या प्रकरणात एटीएसने त्यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यांच्याविरोधात दोन हजार पानांचं आरोपपत्र सादर करण्यात आलं आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) माजी संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय आहे प्रकरण?
डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यावर पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला देशाच्या सुरक्षेशी संबंधित संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप आहे. 'झारा दासगुप्ता' नावाच्या पाकिस्तानी महिलेसोबत त्यांची सोशल मीडियावर ओळख झाली होती. दोघांमध्ये जवळीक वाढली आणि झाराने कुरुलकर यांना आपल्या जाळ्यात ओढले. कुरुलकर यांनी झाराला डीआरडीओमधील काही महत्त्वाची कागदपत्रे आणि गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप आहे. कुरुलकर यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. तसेच, विशेष न्यायालयात आरोपमुक्त करण्याची मागणी केली आहे. त्यांनी शेअर केलेली माहिती सार्वजनिक डोमेनमध्ये होती, असा युक्तिवाद त्यांचे वकील हृषिकेश गानू यांनी केला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 28 फेब्रुवारीला होणार आहे. तोपर्यंत, कुरुलकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Ex MLA Death : किरकोळ कारणावरुन वाद, रिक्षा चालकाच्या मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू

नक्की वाचा - Ex MLA Death : किरकोळ कारणावरुन वाद, रिक्षा चालकाच्या मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू


एटीएसच्या तपासात काय समोर आले?

  • एटीएसच्या तपासात धक्कादायक खुलासे झाले आहेत. 
  • कुरुलकर आणि झारा यांच्यातील संवादामध्ये अनेक संवेदनशील गोष्टी उघड झाल्या आहेत. 
  • झाराने कुरुलकर यांना हनीट्रॅपमध्ये फसवून त्यांच्याकडून गोपनीय माहिती मिळवली, असा एटीएसचा दावा आहे.
  • एटीएसने या प्रकरणी विशेष न्यायाधीश व्ही. आर. कछरे यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. यात कुरुलकर यांच्यावर शासकीय रहस्य कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. 
  • न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी लवकरच सुरू होईल, असं म्हटलं आहे.