riteish deshmukh raja shivaji movie : निश्चयाचा महामेरु.. बहुत जनांसी आधारु... अखंड स्थितीचा निर्धारू... श्रीमंत योगी... महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३९६ वी जयंती. महाराजांच्या जयंतीनिमित्ताने चित्रपटसृष्टीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत 'राजा शिवाजी' चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता रितेश देशमुखने यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.
यामध्ये त्याने 'राजा शिवाजी' चित्रपटाचा पहिला लुक प्रदर्शित केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीने रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत राजा शिवाजी या चित्रपटाचे आकर्षक पोस्टरचं अनावरण केलं आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी भाषेतील द्विभाषिक चित्रपट असेल. ज्योती देशपांडे आणि जेनेलिया रितेश देशमुख निर्मित, संतोष शिवन यांनी चित्रित केले आहे, तर अजय-अतुल यांचं संगीत आहे.
चित्रपट कधी होणार प्रदर्शित...
१ मे २०२६ या दिवशी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोन ते अडीच महिन्यात रितेश देशमुखला शिवरायांच्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे.