'छावा' चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजाची शोर्यगाथा जगभरात पोहचत आहे. संभाजी महाराज इतिहास रुपेरी पडद्यावर पाहून नवीन पिढीचा ऊर देखील अभिमानाने भरून येत आहे. असाच एका लहानग्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. आपल्या शंभूराजाची अनन्वित छळ करुन हालाहाल करून औरंगजेबाने हत्या केली. सिनेमातील हे दृश्य पाहून प्रेक्षकांना भावना अनावर होत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एका लहान मुलासोबतही असंच झालं. मुलगा पालकांसोबत छावा चित्रपट पाहायला गेला होता. चित्रपटाचा शेवट पाहून या मुलाला अश्रू अनावर झाले. महाराजांचा इतिहास पाहून त्याच्या भावना अनावर झाल्या. डोळ्यातून पाणी वाहत असताना त्याने छत्रपती संभाजी महाराजांबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी त्याच्या पालकांनी त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला.
(नक्की वाचा- Chhaava Movie: एक वाक्य अन् अख्खं थिएटर सुन्न! 'छावा'मधील 'हा' डायलॉग आणेल डोळ्यात पाणी)
विकी कौशलने शेअर केला व्हिडीओ
या लहानग्याचा व्हिडीओ विकी कौशलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर देखील शेअर केला आहे. विकी कौशलने म्हटलं की, हीच आमची सर्वात मोठी कमाई आहे. बेटा मला तुझा अभिमान आहे. तुला मिठी मारता आली असती तर बरं होईल. तुमच्या प्रेमाबद्दल आणि भावनांबद्दल सर्वांचे आभार. आम्हाला शंभूराजेंची कहाणी जगातील प्रत्येक घरात पोहोचवायची होती आणि हे घडताना पाहणे हा आमचा सर्वात मोठा विजय आहे."
(नक्की वाचा- Chhaava Movie: महिलांसाठी खुशखबर! 'छावा' चित्रपट मोफत पाहता येणार, कधी अन् कुठे? जाणून घ्या)
तीन दिवसात 100 कोटींची कमाई
छावा चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा ओलांडला. चित्रपटाने 116 कोटी रुपये कमावले आहेत. पहिल्या दिवशी चित्रपटाने 31 कोटी रुपयांचं कलेक्शन केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 37 आणि तिसऱ्या दिवशी 48.50 कोटी रुपये कमावले.