
Chhaava Movie Hit Dialogue: गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेत असलेला बहुचर्चित छावा चित्रपट अखेर आज (14,फेब्रुवारी) प्रदर्शित झाला. बॉलिवूड अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदानाची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचा रिव्यूव्ह मांडताना अंगावर शहारे अन् डोळ्यात पाणी आणणारा हा चित्रपट सर्वांनी पाहण्याचे आवाहन केले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
छत्रपती संभाजीराजे भोसलेंचा पराक्रम, अन् शौर्यगाथा सांगणारा छावा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावाचा ट्रेलर पाहिल्यापासून प्रेक्षकांना या भव्यदिव्य कलाकृतीची उत्सुकता होती. त्यामुळे प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी चित्रपटाला प्रचंड मोठा प्रतिसाद पाहायला मिळत असून चित्रपट कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
चित्रपट पाहताना प्रेक्षकांच्या हर हर महादेवच्या घोषणांनी सिनेमागृहे दणाणत आहेत. चित्रपटातील एकेक शब्द अन् डायलॉग अंगावर काटा आणणारी आहेत. चित्रपटातील एका डायलॉगने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले आहे. जेव्हा औरंगजेबाची मुलगी "संभा अपनी मौत का जश्न मनाकर चला गया और हमें छोड़ गया अपनी जिंदगी का मातम मनाने" हे वाक्य बोलते तेव्हा संपूर्ण हॉल स्तब्ध होतो.
त्यासोबतच 'शेर नही रहा, लेकीन छावा अभी भी जंगल मै घुम रहा है" हा डायलॉगही प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणतो. चित्रपटात विकी कौशलने छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदाना ही महाराणी येसुबाई भोसलेंच्या भूमिकेत आहे. अभिनेता अक्षय खन्नाने यात औरंगजेबाची भूमिका साकारली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world