Cobra Kai Season 6: कराटे प्रेमींमध्ये जबरदस्त क्रेझ असलेल्या सीरिजची प्रतीक्षा संपली! कुठे पाहणार?

Cobra Kai Season 6, Part 3 चा शेवटचा भाग आजपासून ( गुरुवार, 13 फेब्रुवारी 2025) नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Cobra Kai Season 6, Part 3 चा शेवटचा भाग आजपासून ( गुरुवार, 13 फेब्रुवारी 2025) नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे. कराटे प्रेमींमध्ये या सीरिजची जबरदस्त क्रेझ आहे. या सिझनचे यापूर्वीचे सर्व भाग चांगलेच लोकप्रिय आहेत. त्यामुळे नवा भाग कधी प्रदर्शित होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. भारतीय प्रेक्षकांना गुरुवारी दुपारी 1.30 पासून ही सीरिज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

या सिझनचा पार्ट 3 देखील पहिल्या दोन भागांपासून पाच भागांमध्ये बनवला आहे. संपूर्ण सिझनमध्ये एकूण 15 भाग आहेत. सोनी आणि नेटफ्लिक्समधील चर्चेनंतर या सीरिजच्या एका फॉर्मेटवर सहमती झाली होती. त्यानुसार हा सिझन तीन वेगवेगळ्या भागांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. 

कोब्रा काई वेब सीरिज यापूर्वी YouTube वर दाखवण्यात येत होती. त्यानंतर नेटफ्लिक्सनं याचे सर्व हक्क विकत घेतले आहेत. आता या सीरिजचे सर्व सहा सिझन फक्त नेटफ्लिक्सवर पाहाता येतील. या सिझनचा ग्रँड फिनाले देखील नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहे.

काय आहे कथा?

कोब्रा काईची गोष्ट डॅनियल लारुसो आणि जॉनी लॉरेन्स यांच्यातील संघर्षावर आधारित आहे. त्याचबरोबर जॉन क्रिस आणि टेरी सिल्व्हर यांच्यातील संघर्ष देखील यामध्ये दाखवण्यात आला आहे. शेवटचा भाग ताईकाई टुर्नामेंटवर फोकस केला आहे. जगातील आघाडीच्या कराटेपटूंमध्ये या स्पर्धेला मोठं महत्त्व आहे. ही स्पर्धा मियागी-डो आणि कोबरा काई या दोघांच्याही भविष्यावर परिणाम करणारी आहे. या सीरिजबद्दल प्रेक्षकांमध्येही मोठी उत्सुकता आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : India's Got Latent: असभ्यतेचे सर्व रेकॉर्ड तोडणारी Apoorva Mukhija कोण आहे? ती चर्चेत का आहे? )