जाहिरात

India's Got Latent: असभ्यतेचे सर्व रेकॉर्ड तोडणारी Apoorva Mukhija कोण आहे? ती चर्चेत का आहे?

कॉमेडियन समय रैना होस्ट असलेला  India's Got Latent या कार्यक्रमातील एक भाग त्यामधील आक्षेपार्ह वक्तव्यामुळे चर्चेत आहे.

India's Got Latent: असभ्यतेचे सर्व रेकॉर्ड तोडणारी Apoorva Mukhija कोण आहे? ती चर्चेत का आहे?
मुंबई:

India got latent Podcast Samay raina Ranveer Allahabadia : कॉमेडियन समय रैना होस्ट असलेला  India's Got Latent या कार्यक्रमातील एक भाग त्यामधील आक्षेपार्ह वक्तव्यामुळे चर्चेत आहे. या कार्यक्रमातील वक्तव्यामुळे रणवीर अलाहबादिया चांगलाच अडचणीत आला आहे. त्याच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार झाली आहे. त्याचबरोबर होस्ट समय रैना आणि अन्य एक महिला पॅनलिस्ट अपूर्वा मुखिजा देखील अडचणीत आली असून रणवीर आणि समय रैनाप्रमाणेच तिच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणात अपूर्वावर देखील अश्लीलतेला उत्तेजन देणे आणि लैंगिक चर्चेत उडपणे सहभागी झाल्याचा आरोप आहे. तिच्या प्रतिक्रियेची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामध्ये तिने असभ्यतेचे रेकॉर्ड तोडले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कोण आहे अपूर्वा ?

अपूर्वाचा जन्म 2001 साली झाला. ती एक सोशल मीडिया इन्सफ्लूएंसर आहे. अपूर्वाचे इन्स्टाग्रामवर 2.7 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.  'Rebel Kid' या नावानं ती सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. त्याचबरोबर Kaleshi Aurat'  या नावानं देखील ती ओळखली जाते. 

अपूर्वानं शाळेतील शिक्षणानंतर जयपूरच्या मनिपाल विद्यापीठातून कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्याचबरोबर डेल टेक्नॉलजी या कंपनीतही तिनी काम केलंय. त्याबरोबर काही प्रसिद्ध कंपनीमध्ये इंटर्नशिपही केली आहे.

( नक्की वाचा : Indias Got Latent: कॉमेडीच्या नावाखाली विकृती! समय रैना, रणवीर अलाहबादियावर नेटकऱ्यांचा संताप; गुन्हा दाखल )

फोर्ब्सच्या 100 डिजिटल क्रिएटर्सच्या यादीमध्ये तिचा समावेश झाला होता. ती लाईफस्टाईलबाबत लहान ब्लॉग पोस्ट करत असते. यूट्यूबवर तिचे जवळपास 5 लाख सब्स्क्रायबर आहेत.  Who's Your Gynac  या वेब सीरिजच्या माध्यमातून तिनं अभिनयात देखील पदार्पण केलं आहे. कोव्हिड काळात तिच्या अनेक रिल्स व्हायरल झाल्या होत्या. तिनं अनेक ब्रँडसोबत काम केलं आहे. 

अपूर्वानं गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या 'बात पक्की' या हिंदी वेब सीरिजमध्येही काम केलंय. त्याचबरोबर अनेक फॅशन शो मध्येही तिनं रँप वॉक केलं आहे. तिला अनेक पुरस्कारांनी तिचा सन्मान करण्यात आलाय. त्यामध्ये  2024 एंटरप्रेन्योर इंडिया अवॉर्ड, 2024 कॉस्मोपॉलिटन ब्लॉगर अ‍ॅवॉर्ड यांचा समावेश आहे. 

Latest and Breaking News on NDTV

यापूर्वी देखील झाला होता वाद

अपूर्वा मुखीजा वादात अडकण्याचं हे पहिलंच प्रकरण नाही. समय रैनाच्या कार्यक्रमात स्पर्धकांच्या आईबद्दल आक्षेपार्ह प्रतिक्रिया केल्यामुळे ती वादात आहे. यापूर्वी दिल्ली विद्यापीठातील एका कार्यक्रमातही ती वादामध्ये अडकली होती. 

या कार्यक्रमात ती स्टेजवर गेल्यानंतर तेथील एका विद्यार्थ्याथी तिचा जोरदार वाद झाला होता. या वादामध्ये तिच्या माजी बॉयफ्रेंडचा उल्लेख झाल्याचा दावा तिनं केला होता. अपूर्वानं स्टेजवरुनच तिची थट्टा करणाऱ्य व्यक्तीला थेट आव्हान दिलं होतं. त्यानंतर त्या मुलांनी स्टेजवळ जाण्याचा प्रयत्न केल्यानं परिस्थिती आणखी चिघळली होती. परंतू सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करत पुढील अनर्थ टाळला. 

( नक्की वाचा : Samay Raina net worth: बॉलिवूड सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही, कॉमेडियन समय रैनाच्या कमाईचा आकडा ऐकून थक्क व्हाल )

अपूर्वानं नंतर हा सर्व प्रसंग सोशल मीडियावर सांगितला होता. आपल्या काही पोस्टवर त्या व्यक्तील आक्षेप होता, असा दावा अपूर्वानं केला होता. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: