Gautami Patil : आपल्या अदांनी आणि गाण्यांनी चाहत्यांना भुरळ पाडणाऱ्या गौतमी पाटील एक गुड न्यूज घेऊन चाहत्यांसमोर आली आहे. तिने यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. आज गुढीपाडवा. साडे तीन मुहूर्तापैकी एक. या शुभ दिनी गौतमी पाटीलने प्रेक्षकांना एक चांगली बातमी दिली आहे. गौतमीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधील पोस्टर पाहून चाहत्यांनीही आनंद व्यक्त केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर गौतमी पाटीलने साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत 'कृष्ण मुरारी' या गाण्याचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहे. या गाण्याचे निर्माते संदेश गाडेकर आणि सुरेश गाडेकर हे आहेत. गायिका गायत्री शेलार हिने हे गाणं गायलं असून विशाल शेलार यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. मनीष महाजन या गाण्याचे दिग्दर्शक आहे. तर या गाण्याचे संगीत आयोजन आदित्य पाटेकर व करण वावरे यांनी केले आहे. या गाण्याची उत्सुकता गौतमीच्या सर्व चाहत्यांना लागली आहे.
नक्की वाचा - Gulkand Movie : समीर सईला म्हणतोय 'चल जाऊ डेटवर...'; 'गुलकंद' सिनेमातील नवं गाणं रिलीज
गौतमी पाटीलने तिच्या पहिल्या गवळण गीताविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. याबाबत ती म्हणते, लोकसंगीतातील गवळण हा नृत्यप्रकार मला फार आवडतो. माझी खूप दिवसांपासून गवळण करण्याची इच्छा होती. साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत “कृष्ण मुरारी” या गाण्यामुळे माझी इच्छापूर्ती झाली. मी सोशल मीडियावर या गाण्याच पोस्टर नुकतच शेअर केल आहे. प्रेक्षकांचा या गाण्याच्या पोस्टरला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या गाण्याचा टीज़र 3 एप्रिलला प्रदर्शित होईल.